'राजीनामा देणार नाही'
नवी दिल्ली : खरा पंचनामा
'राजीनामा देणार नाही. तसेच स्वेच्छानिवृत्ती स्वीकारणार नाही,' असे पत्र उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी तत्कालीन सरन्यायाधीश संजय खन्ना यांना लिहिले होते. दिल्लीतील निवासस्थानी रोख रक्कम सापडल्यानंतर न्या. यशवंत वर्मा वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.
'हिंदुस्तान टाईम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, यशवंत वर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, असा सल्ला तत्कालीन सरन्यायाधीश संजय खन्ना यांनी ४ रोजी पत्राव्दारे दिला होता. यानंतर ६ मे २०२५ रोजी यशवंत वर्मा यांनी संजय खन्ना यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, हा सल्ला स्वीकारणे म्हणजे पूर्णपणे अन्याय्य निर्णय स्वीकारण्यासारखे असेल, कारण मला माझी बाजू मांडण्याची संधीही देण्यात आली नाही. चौकशी समितीचा अहवाल मिळताच मलाअवघ्या ४८ तासांत जीवन बदलणारा निर्णय घेण्यास सांगण्यात आले, जे केवळ अन्याय्यच नाही तर न्यायालयीन प्रक्रियेच्या मानकांचे उल्लंघन देखील असल्याचेही न्यायाधीश वर्मा यांनी आपल्या पत्रात नमूद केले होते.
दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या दिल्लीतील निवासस्थानाच्या बाहेरील भागात जळालेल्या नोटा सापडल्या होत्या. यावर तत्कालीन सरन्यायाधीश संजय खन्ना यांनी तीन सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली. समितीने त्यांच्या चौकशीत त्यांना दोषी ठरवले आणि गैरवर्तनाचा दोषी ठरवले होते. दरम्यान, न्यायमूर्ती वर्मा यांनी म्हटले की, माझ्यावरील आरोपांबद्दल माहिती देण्याची आणि त्यांची बाजू मांडण्याची योग्य संधी देण्यात आली नाही. त्यांनी संपूर्ण प्रक्रियेचा आढावा आणि पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.