Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आधुनिक पालक अन सक्षम पिढी...

आधुनिक पालक अन सक्षम पिढी...

पूजा फडके
सांगली : खरा पंचनामा

जागतिक पालक दिन दरवर्षी १ जून रोजी साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघटनेने (United Nations) २०१२ मध्ये १ जून हा 'जागतिक पालक दिन' म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. जगभरातील सर्व पालकांचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. पालक आपल्या मुलांच्या संगोपनासाठी, त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींना तोंड देण्यासाठी आणि त्यांना एक चांगले भविष्य देण्यासाठी परिश्रम घेतात. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. सध्याच्या परिस्थितीमध्ये पालक आणि मुले यांच्यात संवाद कमी होत आहे, मुले घराबाहेर शिक्षण, नोकरीनिमित पडलेली आहेत. त्याच्यात एक प्रकारचे संवादाचे, प्रेमाचे, लाईफस्टाईलचे अंतर पडलेले आहे. तर आज आधुनिक पालक म्हणून काय पालक भूमिका बजावतता यावर मांडलेला लेख...
"आधुनिक पालक" ही संकल्पना आजच्या वेगाने बदलणाऱ्या जगात पालकत्वाची भूमिका कशी बदलली आहे हे दर्शवते. आता पालकत्व म्हणजे केवळ मुलांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे नाही, तर त्यांना शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या सक्षम बनवणे.

आधुनिक पालकत्व काय करते 
• संवाद, मोकळेपणा: पालक मुलांशी मोकळा संवाद साधण्यावर भर देतात. त्याची मते ऐकतात. त्यांना प्रश्न विचारण्याची आणि स्वतःचे विचार मांडण्याची संधी देतात.
• तंत्रज्ञानाचा वापर: आजच्या डिजिटल युगात, आधुनिक पालक तंत्रज्ञानाशी जुळवून घेतात आणि मुलांच्या शिक्षणासाठी व मनोरंजनासाठी त्याचा जबाबदारीने वापर करतात. ते मुलांसाठी स्क्रीन टाइमचे नियम ठरवतात आणि ऑनलाइन सुरक्षिततेकडे लक्ष देतात.
• व्यक्तिस्वातंत्र्याचा आदर: मुलांना स्वतःचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देणे आणि त्यांच्या आवडीनिवडीचा आदर करणे हे आधुनिक पालकत्वाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. 
• शिकण्याची प्रक्रिया: आधुनिक पालक मुलांसोबतच स्वतःही शिकत राहतात. 
• करियर आणि आव्हाने : करिअर, वैयक्तिक जीवन आणि पालकत्व यामध्ये समतोल साधणे हे आधुनिक पालकांसमोरील एक मोठे आव्हान आहे, परंतु ते यावर लक्ष केंद्रित करतात.
• भावनिक आधार: मुलांना केवळ भौतिक गरजाच नव्हे, तर भावनिक आधार देतात.
आधुनिक पालकत्वाची आव्हाने
• स्क्रीन टाइमचे व्यवस्थापन: मुलांना डिजिटल उपकरणांपासून दूर ठेवणे आणि त्यांच्यासाठी निरोगी स्क्रीन टाइम निश्चित करणे.
• स्पर्धात्मक जग: शैक्षणिक आणि करिअरमधील वाढती स्पर्धा, मुलांवर त्याचा येणारा ताण आणि त्यातून येणारे मानसिक आरोग्य प्रश्न.
• वेळेची कमतरता: दोन्ही पालक नोकरी करत असल्यामुळे मुलांसाठी पुरेसा वेळ काढणे कठीण होते.
• सामाजिक दबाव: इतर पालकांच्या अपेक्षा आणि सोशल मीडियावरील पालकांच्या "परफेक्ट" इमेजचा दबाव.
आधुनिक पालक आणि टिप्स 
• मुलांशी नियमित संवाद साधा
• तंत्रज्ञानाचा योग्य वापर शिकवा
• त्यांना चुका करण्याची संधी द्या 
• त्यांच्या आवडींना पाठिंबा द्या
• स्वतःसाठी वेळ काढ. 

भावनिकदृष्ट्या मुलांना सक्षम बनवा...
सध्याचे युग जसे IT चे आहे तसे आजचे युग हे IQ(intelligence) चे नसून EQ (emotional intelligence) चे आहे. आजची मुले ही भावनिकदृष्ट्या इतरांवर अवलंबून आहेत. त्यांना भावनिकदृष्ट्या सक्षम करणे पालकांपुढे मोठे आव्हान आहे. आज ती भावनिकदृष्ट्या सक्षम नसल्यामुळे सैरभैर झालेली दिसत आहेत. स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकत नाहीत. त्यामुळे चुकीचे निर्णय घेणे, व्यसनाच्या आहारी जाणे, चुकीचे पाउल उचलणे, संगत चुकणे त्यातून चुकीचे प्रकार घडणे असे प्रकार घडताना दिसतात. त्यामुळे मुलांचा भावनिक विकास होणे गरजेच आहे. त्यांची दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची जी गरज आहे ती संपून ते स्वतः भावनिकदृष्ट्या सक्षम होणे गरजेचे आहे. - पवनकुमार आनंदराव गायकवाड, मानसतज्ञ तथा अध्यक्ष, व्यक्तित्व विकास प्रबोधिनी.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.