संभाजी ब्रिगेडने संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख बंद करावा
सांगलीत शुक्रवारी बाईक रॅली : शिवधर्म फोंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक अण्णा काटे
पहा व्हिडीओ
सांगली : खरा पंचनामा
संभाजी ब्रिगेडकडून आपल्या नावात संभाजी एकेरी उल्लेख करीत छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान केला जातं आहे. त्यामुळे या नावाला शिवधर्म प्रतिष्ठानने आक्षेप घेतला आहे. संभाजी ब्रिगेडने त्वरित आपल्या पक्ष संघटनेच्या नावात संभाजी ब्रिगेड असा एकेरी उल्लेख न करता छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड किंवा पक्ष अशा स्वरूपाचा बदल करावा अशी मागणी शिवधर्म फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक अण्णा काटे यांच्याकडून करण्यात आली आहे. यां मागणीसाठी 13 जुन रोजी सांगलीत भव्य रॅली काढून मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार आहे, असेही काटे यांनी सांगितले.
काटे म्हणाले, यापुढे संभाजी असा एकेरी उल्लेख आढळून आल्यास होणाऱ्या परिणामला प्रवीण गायकवाड हे जबाबदार असतील इशारा शिवधर्म फोंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत दिला आहे.
यावेळी फॉउंडेशनचे सांगली जिल्हाध्यक्ष सागर पाटील, सोलापूर जिल्हाध्यक्ष रविराज लेंगरे, मोहन शिंदे, शिवतेज सावंत, सचिन सूर्यवंशी, राहुल माने, अमित पवार, सुजल वाघमारे, प्रज्वल कांबळे, भोजराज दोलतोडे, मयूर वाघमारे, ऋषिकेश भोई आदी उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.