'सहन करायला शिक' सुप्रिया सुळेंचं स्टेटस
अजितदादांची रोज आठवण येतेय !
पुणे : खरा पंचनामा
एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार, अशा चर्चा सुरु आहेत. तर दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, असंही बोललं जातंय. खुद्द शरद पवार यांनीही पक्षाचे काही नेते सत्तापक्षासोबत जाण्यास इच्छूक असल्याचं म्हटलं होतं. त्यातच मंगळवारी राष्ट्रवादीचा वर्धापन दिन साजरा होत आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी एक व्हॉट्सअप स्टेटस ठेवलं आहे. त्यात त्या म्हणतात, कर्तव्य करत राहायचं, संस्कार कधी विसरायचे नाहीत.. "सहन करायला शिक" आईने मला सांगितलं होतं, हे मी रोज स्वतःला सांगते. असं म्हणत सुळेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
'आपल्या डोळ्यासमोर अन्याय होत असतो, आपण प्रयत्न करत रहायचे', असंसुद्धा सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या स्टोरीमध्ये लिहलंय. माझ्या आईने मला सल्ला दिला तो मी माझ्या व्हॉट्सअप स्टेट्सला ठेवला, ते माझं वैयक्तिक मत आहे, असा खुलासा त्यांनी केला.
माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, दादांची (अजित पवार) रोजच आठवण येते. दिवाळी, भाऊबीज आणि इतर सणांना मी त्यांना शुभेच्छा देत असते. मला सहा भाऊ आहेत, सगळ्यांचीच आठवण येते.
दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रित येण्याबद्दल सुप्रिया सुळेंना विचारण्यात आलं. तेव्हा त्या म्हणाल्या, मी मागच्या काही दिवसांपासून देशाबाहेर होते त्यामुळे कार्यकर्त्यांशी आणि कुटुंबाशी या विषयावर बोलू शकले नाही.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.