कोल्हापुरातील उद्धवसेनेचे उपनेते संजय पवारांनी दिला राजीनामा
कोल्हापूर : खरा पंचनामा
उद्धवसेनेचे उपनेते, माजी जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. विधानसभा निवडणूकीपासून जिल्हाप्रमुख नेमणूकीपर्यंत पक्षाने विश्वासात घेतले नसल्याने राजीनामा देत असलो तरी गेली ३६ वर्षे 'मातोश्री'वर श्रध्दा ठेवून काम केले आणि येथून पुढे शेवटचा श्वास असेपर्यंत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा सेवक म्हणून काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
उद्धदसेना जिल्हाप्रमुख पदासाठी पक्षातील अनेकजण इच्छुक होते. संजय पवार यांनी इच्छुकांची नावे पक्षप्रमुखांना अनेक वेळा पाठवली होती. पण, शुक्रवारी माजी नगरसेवक रविकिरण इंगवले यांचे नाव जाहीर केल्याने पक्षात असंतोष निर्माण झाला. त्यातून युवा सेनेचे माजी जिल्हाप्रमुख हर्षल सुर्वे यांनी राजीनामा दिला. तर, उपनेते संजय पवार यांनी सोमवारी भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगितले.
त्यानुसार सोमवारी, शासकीय विश्रामगृहावर उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली, यामध्ये त्यांनी उपनेते पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. यावेळी, राजीनामा देऊ नका, तुम्ही देणार असाल तर सगळेच राजीनामा देतो असा नका, तुम्ही देणार असाल तर सगळेच राजीनामा देतो असा आग्रह पदाधिकाऱ्यांनी धरला. पण, ते राजीनाम्यावर ठाम राहिले.
पक्षाचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, उपजिल्हाप्रमुख बाजीराव पाटील, अवधूत साळोखे, विराज पाटील, माजी जिल्हा प्रमुख रवि चौगुले, माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तूरे, राजू यादव, विशाल देवकुळे आदी उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.