समलैंगिक संबंधास विरोध केल्याने मित्राला तलावात बुडवून मारले
आरगमधील धक्कादायक घटना : दोन अल्पवयीन ताब्यात
सांगली : खरा पंचनामा
मित्राशी समलैंगिक संबंध करण्याचा प्रयत्न करताना त्याला विरोध केल्याने मित्राला तलावाच्या पाण्यात बुडवून ठार मारण्यात आले. ही घटना रविवारी रात्री आरग येथे घडली. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
सुजल बाजीराव पाटील (वय २१, रा. आरग, ता मिरज) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी प्रवीण निकम यांनी फिर्याद दिली आहे. सुजल आणि त्याचे दोन अल्पवयीन मित्र रविवारी रात्री आरग येथील तलावाच्या जवळ गेले होते. त्यावेळी चेष्टा मस्करी करत त्यातील एका मुलाने मृत सुजल याच्या अंगावरील कपडे काढले. आणि त्याच्याशी समलैंगिक संबंध करण्याचा प्रयत्न करू लागला. त्याला सुजल याने विरोध केला. तसेच त्यांना शिवीगाळ केली.
सुजलने विरोध केल्याचा राग आल्याने दोघांनी त्याला लाथा बुक्क्यानी मारहाण केली. त्यांनतर त्याला ओढत नेऊन दाबून तलावात बुडवले. त्यातच सुजलचा मृत्यू झाला. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक श्री. सिद्ध अधिक तपास करत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.