कोकण, मुंबईत मान्सून रेंगाळला
गुरुवारपासून मुसळधार पावसाचा इशारा, अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
मुंबई : खरा पंचनामा
मुंबईसह कोकणात लवकरच दाखल झालेला मान्सून सध्या स्थिरावलेला असतानाच, हवामान खात्याने पुढील पाच दिवसांत राज्यात मोठ्या हवामान बदलांचा इशारा दिला आहे. गुरुवारपासून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मान्सून आगमनाच्या दिवशी मुंबईत जोरदार पावसाचा दणका बसला. मात्र, त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली असून, परिणामी मुंबईकर उकाड्याने हैराण झाले आहेत. वातावरणात वाढलेली आर्द्रता आणि तापमानामुळे नागरिक पुन्हा एकदा घामाघूम होत आहेत.
पुढील तीन आठवडे देशभर पावसाचा जोर
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ३० जूनपर्यंत देशात आणि महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे.
पहिला आठवडाः कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस
दुसरा आठवडाः मध्य भारतात जोर
तिसरा आठवडाः मध्य भारतात पावसाचा आणखी जोर
संपूर्ण देशात पुढील तीन आठवड्यांत सरासरीहून अधिक पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे काही भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर
गुरुवारः
अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, सांगली, कोल्हापूर
शुक्रवारः
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली
शनिवार व रविवारः
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.