Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'संतपूजन सोहळा २०२५' मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हानामदार चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

'संतपूजन सोहळा २०२५' मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा
नामदार चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

पुणे : खरा पंचनामा

वारी म्हणजे भक्ती, परंपरा आणि सेवाभावाची जिवंत साखळी...! वारकऱ्यांचे कष्ट, संतांच्या स्मृती आणि समाजासाठीची आपली बांधिलकी, हीच प्रेरणा घेऊन   उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने भाजपचे सरचिटणीस गिरीश खत्री यांनी सलग तिसऱ्या वर्षी सोमवार दिनांक ९ जून २०२५ रोजी संध्याकाळी ५ वाजता, महालक्ष्मी लॉन, डी.पी. रोड, राजाराम पुलाजवळ, कर्वेनगर, पुणे येथे सलग तिसऱ्या वर्षी संतपूजन आणि वारकऱ्यांना उपयुक्त अशा विविध साहित्याचे वाटप उपक्रम आयोजित केला आहे. सर्व पुणेकर नागरिक, वारकरी बांधव आणि भक्तमंडळींना या भक्तिभावाने ओतप्रोत भरलेल्या सोहळ्यास उपस्थित राहावे अशी विनंती चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. 

चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, दरवर्षी जून महिना आला कि वारीला जाण्याची तयारी सुरु होते. आळंदीहून संत ज्ञानेश्वरांची आणि देहूहून संत तुकाराम महाजांची पालखी निघेल आणि वारी सुरु होईल. हजारो लाखोंच्या संख्येने वारकरी त्याला जोडले जात जात शेवटी आषाढी एकादशीच्या दिवशी सर्व पालख्या पंढरपुरात दाखल होतात. गेले तीन वर्ष भाजपचे सरचिटणीस गिरीश खत्री यांच्या पुढाकाराने  खूप मोठा असा सांज पूजनाचा कार्यक्रम आयोजित करतात. या कार्यक्रमात प्रवचनं होतात, भजन होतात. सगळे भक्तिरसात न्हाऊन निघतात. यावेळी चंद्रकांत पाटील हे सपत्नीक सर्व संतांच पाद्यपूजन करतात. 

यंदाच्या वर्षी 'संतपूजन सोहळा २०२५' हा कार्यक्रम ९ जून रोजी सायंकाळी ५ ते ९ यावेळेमध्ये महालक्ष्मी लॉन, डी.पी. रोड, राजाराम पुलाजवळ, कर्वेनगर, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. या प्रचंड मोठ्या आध्यत्मिक कार्यक्रमामध्ये अध्यात्मिक आनंद घेण्यासाठी सर्व पुणेकरांनी सहभागी व्हावे असे आवाहन पाटील यांनी केले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.