धार्मिक संस्थेत अल्पवयीन विद्यार्थ्याची झोपेतच शॉक देऊन हत्या
शाळेला कायमची सुटी मिळावी यासाठी अल्पवयीन मुलाचे कृत्य
कोल्हापूर : खरा पंचनामा
राज्यातील पुरोगामी विचारांचा वारसा जपणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील आळते येथे एका धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थेत अल्पवयीन विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे.
या घटनेमुळे कोल्हापूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. फैजान नाजिमा (वय 11) असे मृत मुलाचे नाव आहे. या संस्थेतील एका अल्पवयीन मुलानेच फैजानची हत्या केल्याचे उघड झाले आहे. ही संस्था बंद पडून आपल्याला घरी जायला मिळावे, यासाठी अल्पवयीन विद्यार्थ्याने फैजानची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
आळते येथे असणाऱ्या या धार्मिक शिक्षण संस्थेत तब्बल 80 विद्यार्थी आहेत. यापैकी बहुतांश म्हणजे 70 विद्यार्थी हे बिहारमधील आहेत. हत्या झालेला फैजान नजीमा आणि हत्या करणारा हे दोघेही बिहारचे होते. हत्या करणाऱ्या विद्यार्थ्याला बिहारमधील आपल्या गावी जायचे होते. त्यासाठी ही संस्था बंद पडावी, या उद्देशाने त्याने फैजानची शॉक देऊन हत्या केली.
अलीकडेच फैजानचा मृतदेह सापडला होता. झोपेतच त्याचा मृत्यू झाल्याचे सुरुवातीला सांगितले जात होते. मात्र, पोलिसांना संशय आल्याने त्यांनी संस्थेतील मुलांची चौकशी केली. त्यावेळी एका अल्पवयीन विद्यार्थ्याने आपणच फैजानला इलेक्ट्रिक वायरचा शॉक देऊन त्याची हत्या केल्याची कबुली दिली.
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात आळते या गावात धार्मिक शिक्षण देणारी संस्था आहे. या संस्थेत बहुसंख्य विद्यार्थी हे बिहार या राज्यातील आहेत. एकूण 80 मुलं या संस्थेत धार्मिक शिक्षण घेतात. त्यापैकी 70 विद्यार्थी हे बिहारचे आहेत. अल्पवयीन मुलं घर सोडून शेकडो किमी परराज्यात महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात येतात, तिथे धार्मिक शिक्षण घेतात. या सर्व प्रकाराला कंटाळून, घरापासून लांब राहण्याला वैतागून विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल उचललं.
शिक्षण संस्था बंद पडून घरी जायला मिळावे म्हणून विद्यार्थ्यानेच विद्यार्थ्याची शॉक देऊन हत्या केली. फैजान नाजिमा असं या मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. तो 11 वर्षाचा होता. फैजान याचा झोपलेल्या अवस्थेत मृत्यू झाला होता. मात्र हा मृत्यू संशयास्पद वाटल्याने, पोलिसांनी अधिक चौकशी केली. यावेळी पोलिसांच्या चौकशीत संस्थेतीलच एका अल्पवयीन विद्यार्थ्याने इलेक्ट्रिक वायरचा शॉक देऊन हत्या केल्याचे कबूल केले. इतकी थरारक, धक्कादायक आणि तितकीच हादरवणारी ही महाराष्ट्रातील पहिली घटना असावी.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.