Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

स्व. वसंतदादा पाटील यांच्या नातसून जयश्रीताई पाटील आणि त्यांच्या शेकडो समर्थकांचा भाजपात प्रवेश...सांगली जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात भाजपाला बळ मिळेल : मंत्री चंद्रकांत पाटील

स्व. वसंतदादा पाटील यांच्या नातसून जयश्रीताई पाटील आणि त्यांच्या शेकडो समर्थकांचा भाजपात प्रवेश...
सांगली जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात भाजपाला बळ मिळेल : मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई : खरा पंचनामा

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, राज्याचे लोकप्रिय काँग्रेस नेते स्व. वसंतदादा पाटील यांच्या नातसून जयश्रीताई पाटील आणि त्यांच्या शेकडो समर्थकांनी आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, आमदार संजय केनेकर, भाजप सांगली जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकारीही उपस्थित होते.

सांगली जिल्ह्याचा पालकमंत्री आणि भाजपाचा सामान्य कार्यकर्ता म्हणून मी जयश्रीताईंचे भाजपात स्वागत करतो. त्यांच्या भाजपा प्रवेशामुळे सांगली जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीला बळ मिळेल, असा विश्वास वाटत असल्याचे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. 

या सोहळ्यात माजी महापौर किशोर शहा, कांचनताई कांबळे, माजी उपमहापौर प्रशांत पाटील मजळेकर, विरोधी पक्षनेता उत्तम साखळकर, माजी स्थायी समितीचे सभापती संतोष पाटील, माजी सभापती शेवंताताई वाघमारे, माजी नगरसेवक अजित सूर्यवंशी, रोहिणी पाटील, मृणाल पाटील, करण जामदार, प्रकाश मुळके, अजित दोरकर, तानाजी पाटील, सुभाष यादव, संग्राम पाटील, आनंदराव पाटील, सांगली जिल्हा मजूर फेडरेशनचे अध्यक्ष सुनील जाधव पाटील व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला.

जयश्री पाटील या दिवंगत काँग्रेस नेते आणि माजी मंत्री मदन पाटील यांच्या पत्नी असून, त्या काँग्रेस महिला आघाडीच्या माजी जिल्हाध्यक्षा आणि एक प्रभावी महिला नेत्या म्हणून ओळखल्या जात होत्या. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्ष पदावर त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातील भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या श्रीमती पाटील या पहिल्या व्यक्ती ठरल्या आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.