Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

जालिंदर सुपेकर यांच्या PSI मेहुण्यावर सुद्धा आरोप, प्रमोशन कसं झालं?

जालिंदर सुपेकर यांच्या PSI मेहुण्यावर सुद्धा आरोप, प्रमोशन कसं झालं?

पुणे : खरा पंचनामा

वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणात पोलिसांनी वैष्णवीचा पती, दीर, सासू, सासरा आणि नणंद यांना अटक केली आहे. आता या हगवणे कुटुंबाशी संबंधित जे त्यांचे नातेवाईक आहेत, त्यांच्यावर सुद्धा वेगवेगळे आरोप होत आहेत.

आयपीएस जालिंदर सुपेकर यांच्यावर आरोप होत आहेत. जालिंदर सुपेकर हे वैष्णवीचा पती शशांक हगवणे याचे मामा लागतात. जालिंदर सुपेकर यांच्याकडून आधीच कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार काढून घेण्यात आला आहे. त्यांच्याकडून नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरचा अतिरिक्त कार्यभार काढून घेण्यात आला आहे.

आता जालिंदर सुपेकरांचे मेहुणे शशिकांत चव्हाण यांच्याबद्दल काही गोष्टी समोर आल्या आहेत. शशिकांत चव्हाण हे खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांनी फरार होण्यासाठी थार गाडीचा उपयोग केला, ती थार गाडी संकेत चोंधे याची होती. याच संकेत चोंधेच्या भावाच्या पत्नीने छळवणूक होत असल्याबाबत खडक पोलीसात तक्रार दिली होती. यावर कोणतीही कारवाई न केल्याचा आरोप तक्रारदार धनश्री चोंधे यांनी केला आहे.

जालिंदर सुपेकर यांचे मेहुणे शशिकांत चव्हाण यांच्यावर यापूर्वी सुद्धा आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नारायणगाव, हाणामारी व जीवे मारण्याचा प्रयत्न. अॅट्रॉसिटी हे गुन्हे दाखल आहेत. मात्र, तरी देखील त्यांचं प्रमोशन कसं काय झालं? असा प्रश्न विचारला जातोय.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.