सांगली, सोलापूर, सातारा जिल्ह्यातील 19 गुन्हे उघड : 8 जणांना अटक
35.25 लाखांचा मुद्देमाल जप्त : सांगली एलसीबीची कारवाई
पहा व्हिडीओ
सांगली : खरा पंचनामा
सांगली, सोलापूर, सातारा जिल्ह्यात झालेले जबरी चोरी, घरफोडी, चैन स्नॅचिंगचे तब्बल 19 गुन्हे उघडकीस आणण्यात सांगली एलसीबीच्या पथकाला यश आले आहे. या गुन्ह्यांमध्ये 8 जणांना अटक करून 35.25 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्ह्यातील विविध प्रकारच्या चोरीचे गुन्हे उघडकीस आणून गुन्हेगारांना पकडण्याच्या सूचना अधीक्षक घुगे यांनी एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांना दिल्या होत्या. त्यानुसार त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार, सिकंदर वर्धन, नितीन सावंत यांची तीन पथके तयार केली होती. यातील सावंत यांच्या पथकाने रिजवान रफिक पठाण (वय ३३, रा. ख्वॉजा बस्ती, मिरज), अलताफ रियाज नदाफ (वय 23, रा. मिरज), प्रदिप चद्रय्या प्रभु, वय ३० वर्षे, रा. हनुमान मंदीराजवळ, बेळगाव) यांना अटक करून दोन गुन्हे उघडकीस आणत मिरजेतील एसटी स्टॅंड परिसरातून त्यांनी चोरलेले 2.75 लाखांचे 26 मोबाईल जप्त करण्यात आले.
पवार यांच्या पथकाने आष्टा येथील वाडकर गल्लीत झालेल्या घरफोडीतील गोपी उर्फ टावटाव तिरश्या काळे (वय २२), लेंग्या ऊर्फ तायल तिरश्या काळे, वय २२, दोघे रा. ऐतवडे बुद्रुक, ता. वाळवा) या दोघांना अटक करून त्यांच्याकडून आष्टा येथील 4 आणि कराड येथील एक असे पाच गुन्हे उघडकीस आणत दागिने, दुचाकी, मोबाईल असा 1.30 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पवार यांच्या पथकाने जत तालुक्यातील बसर्गी येथील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत सागर चंदु सांळुखे (वय ३०, रा. उमराणी रोड, जत) याला अटक करून 6.23 लाखांचे दागिने जप्त करण्यात आले. त्यांच्याकडून जतमधील दोन, कवठेमहांकाळ येथील एक गुन्हा उघडकीस आणण्यात आला आहे.
वर्धन यांच्या पथकाने रोहन राजेद्र चव्हाण (वय २१, रा. सभाजीनगर, पंचवटी, अकलुज, जि. सोलापुर) याला अटक करून तासगाव तालुक्यातील गोटेवाडी येथील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत एक दुचाकी, सोन्या चांदीचे दागिने असा 7.50 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याच्याकडून तासगाव, आटपाडी, विटा, कुंडल, माळशिरस येथील गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे.
पवार आणि सावंत यांच्या पथकाने लोकेश रावसाहेब सुतार (वय ३१, रा. लिंगनुर, ता. मिरज) याला अटक करून 8.77 लाखांचे दागिने, 59 हजारांची रोकड जप्त केली. त्याच्याकडून विश्रामबाग येथील एक सांगली शहरचे दोन गुन्हे उघडकीस आणण्यात आले.
पोलीस अधीक्षक संदीप घुगे, एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, नितीन सावंत, सिकंदर वर्धन, जयदीप कळेकर, सायबरच्या सहायक निरीक्षक रुपाली बोबडे, सागर लवटे, संदीप नलवडे, अमर नरळे, मच्छिन्द्र बर्डे, संदीप गुरव, विक्रम खोत, महादेव नागणे, उदय माळी, अरुण पाटील, उदय साळुंखे, अतुल माने, गुंडोपंत दोरकर, सोमनाथ पतंगे, बाबासाहेब माने, संकेत कानडे, अभिजित माळकर, ऋषिकेश सदामते, प्रकाश पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.