बंद घर फोडून चक्क अल्पवयीन मुलीने मारला दागिन्यावर डल्ला
घाटनांद्रे येथील चोरीचा उलगडा, 3.60 लाखांचे दागिने जप्त : सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटनांद्रे येथील बंद घर फोडून अल्पवयीन मुलीने दागिन्यावर डल्ला मारल्याचे स्पष्ट झाले आहे. तिला ताब्यात घेऊन 3.60 लाखांचे दागिने जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली.
दि. 17 जून रोजी घाटनांद्रे येथील बाबासाहेब शिंदे घर बंद करून परगावी गेले होते. ते परतल्यानंतर घरात चोरी झाल्याचे तसेच 3.60 लाखांचे दागिने अज्ञाताने लंपास केल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. चोरट्याला पकडण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक पंकज पवार यांचे पथक तयार केले होते. पथकातील संदीप नलवडे यांना ही चोरी शिंदे यांच्या शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीने ही चोरी केल्याची माहिती मिळाली.
तिला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर तिने चोरीची कबुली दिली. तिच्याकडून 3.60 लाखांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, अंगुली मुद्राच्या सहायक निरीक्षक प्रियांका संकपाळ, स्वप्ना गराडे, संदीप नलावडे, सोमनाथ गुंडे, नागेश खरात, अमर नरळे, अमीरशा फकीर, सागर लवटे, अनिल कोळेकर, महादेव नागणे, मच्छिद्र बर्डे, सागर टिंगरे, संदीप गुरव, उदय माळी, सतिश माने, विक्रम खोत, केरुबा चव्हाण, अंगुली मुद्राचे संतोष चव्हाण, विवेक बाबर, सायबरचे अभिजीत पाटील, अजय पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.