नोव्हेंबरमध्ये जिल्हा परिषद अन् महापालिका निवडणुका...
छत्रपती संभाजीनगर : खरा पंचनामा
गेल्या पाच वर्षांपासून स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका रख रखडल्या आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, या निवडणुका नेमक्या कधी होणार याची मोठी माहिती समोर आली आहे.
छत्रपती संभाजी नगर येथे राज्य निवडणूक आयोगाची स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या दृष्टिने आढाव बैठक पार पाडली. या बैठकीत निवडणुका कधी होणार याची संकेत देण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाकडील मनुष्यबळ आणि साधनसामुग्रीचा विचार करता एकाच टप्प्यात या निवडणूक घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे टप्प्याटप्प्याने निवडणूक होणार आहे. त्यामध्ये सर्वप्रथम ऑक्टोबर महिन्यात पंचायत समिती आणि नगर परिषदेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. तर नोव्हेंबरमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा बार उडणार आहे.
जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणूक देखील एकत्र घेणे शक्य नसल्याने डिसेंबर महिन्यास सर्व महापालिकांची निवडणूक होणार असल्याचा अंदाज आहे. साधारण दोन ते तीन टप्प्यांमध्ये स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका पार पडण्याची शक्यता आहे. त्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. ऑक्टोबरमध्ये पंचायत समिती, नगर परिषदेच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात होण्याची शक्यता आहे.
मे महिन्यात सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र, वॉर्ड रचना, आरक्षण आणि मतदार याद्या तयार करणे आदी कामांसाठी लागणार वेळ पाहात या निवडणुका चार महिन्यात घेणे शक्य नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळेच टप्प्याटप्प्याने निवडणुका घेण्याची तयारी निवडणूक आयोगाने केली आहे. त्यातही जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीचा बार हा दिवाळीनंतरच उडणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.