40 वर्षीय शिक्षिकेचा 11 वीच्या विद्यार्थ्यावर बलात्कार
फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये नेऊन ठेवायची संबंध
मुंबई : खरा पंचनामा
मुंबई पोलिसांनी देशातील अव्वल पाच शाळांपैकी एक असलेल्या मुंबईतील एका नामांकित शाळेतील महिला शिक्षिकेला अल्पवयीन विद्यार्थ्यावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. दादर पोलिसांनी या शिक्षिकेविरुद्ध पोक्सो कायदा, बाल न्याय कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या गंभीर कलमांखाली गुन्हाही नोंदवला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा लैंगिक अत्याचार गेल्या एक वर्षापेक्षा जास्त काळापासून सुरू होता. या काळात, आरोपी शिक्षिकेने (वय 40) विद्यार्थ्याला दक्षिण मुंबईतील अनेक पंचतारांकित हॉटेल्समध्ये नेऊन त्याचे लैंगिक शोषण केले. विद्यार्थ्याने गप्प राहावे, यासाठी ती त्याला नैराश्यविरोधी औषधंही देत होती. विद्यार्थी अकरावीमध्ये शिक्षण घेत होता.
परीक्षा संपल्यानंतर, आरोपी शिक्षिकेने आपल्या नोकराला विद्यार्थ्याला भेटण्यासाठी पाठवले. यावेळी विद्यार्थ्याने आपल्या पालकांना या भयंकर अनुभवाची माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने पोलिसांकडे तक्रार नोंदवली आणि पोलिसांनी त्वरित कारवाई करत शिक्षिकेला अटक केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून सुरु आहे.
शिक्षिका संबंधित विद्यार्थ्याला दक्षिण मुंबईतील विविध पंचतारांकित हॉटेल्समध्ये, तसेच विमानतळाजवळील लॉजमध्ये घेऊन जाऊन त्याच्यावर लैंगिक अत्याचार करत होती. हे संबंध प्रस्थापित करण्याआधी ती अनेकदा त्याला मद्य पाजत असे, असे पोलिसांनी सांगितले.
या शिक्षिकेच्या अटकेनंतर, देशातील एक प्रतिष्ठित शाळा आणि तिचे काही प्रसिद्ध माजी विद्यार्थी यांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. सध्या ही शिक्षिका पोलिस कोठडीत असून तपास अधिकाधिक खोलात सुरू आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.