Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

निवडणूक आयोगाचा शरद पवारांच्या नेत्याला झटका'त्या' निर्णयाला 4 दिवसांतच स्थगिती

निवडणूक आयोगाचा शरद पवारांच्या नेत्याला झटका
'त्या' निर्णयाला 4 दिवसांतच स्थगिती

पुणे : खरा पंचनामा

विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांकडून evm मशीनबाबत संशय व्यक्त करण्यात आला होता. महाविकास आघाडीच्या तब्बल 105 उमेदवारांनी फेर मतमोजणीची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने मूळ मतदान न मोजता मॉक पोलद्वारे मतदान मोजण्याचा पर्याय उमेदवारांसोबत ठेवला होता.

मात्र, या विरोधात काही उमेदवारांनी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. कोर्टाच्या निर्णयानंतर उमेदवारांची फेरमतमोजणीची मागणी मान्य करत 25 तारखेला फेर मोजणी करणार असल्याचं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं होतं. मात्र, निवडणूक आयोगाने हा निर्णय स्थगित केला आहे.

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रभरातून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आणि उमेदवारांकडून यांनी निकालावर संशय व्यक्त करण्यात आला. पुण्यातील देखील महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी या निकालावर मोठ्या प्रमाणात आक्षेप घेतले. हडपसर विधानसभा मतदारसंघाचा संपूर्ण हडपसर मतदारसंघात प्रशांत जगताप यांच्या विजय होईल असं वाटत असतानाच त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणात निवडणूक निकालावर संशय व्यक्त केला.

प्रशांत जगताप यांनी या निकालाला आव्हान देत 27 मतदान यंत्रांची पुन्हा मोजणी करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली. या पुनर्मोजणीसाठी प्रशांत जगताप यांनी 12 लाख 74 हजार रुपयांचे शुल्कही भरले. त्यानंतर नियमाप्रमाणे 45 दिवसाच्या आत उच्च न्यायालयात याचिका दाखल करत हडपसर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेत आक्षेप नोंदवला. मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी अजूनही प्रलंबित आहे.

दरम्यानच्या काळात निवडणूक आयोगाने 27 मतदान यंत्रांची मोजणी करण्याचे मान्य केले. मात्र प्रत्यक्षात झालेले मतदान न मोजता या यंत्रांमध्ये मॉक पोल करून त्याची मोजणी करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. याविरोधात प्रशांत जगताप यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत मॉक पोल न करता प्रत्यक्ष झालेले मतदान मोजण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये 25 जुलै 2025 पासून 2 ऑगस्ट 2025 पर्यंत हडपसर विधानसभा मतदारसंघातील संबंधित 27 मतदान यंत्रांची पुनर्मोजणी निवडणूक आयोगाने आयोजित केली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणाचा अद्यापही निकाल लागलेला नसल्याने सदर मोजणीत तांत्रिक अडचणी उद्भवल्या आहेत. या कारणास्तव हडपसर विधानसभा मतदारसंघाची पुनर्मोजणी पुढे ढकलण्यात आली आहे.

याबाबत प्रतिक्रिया देताना प्रशांत जगताप यांनी विलंब लागला तरी विजय न्यायाचाच होणार हा विश्वास व्यक्त केला. पुनर्मोजणी केवळ पुढे ढकलण्यात आली असून रद्द झालेली नाही, जेव्हा ही मोजणी होईल तेव्हा सत्य जगासमोर नक्की येईल अशी भूमिका प्रशांत जगताप यांनी मांडली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.