फडणवीस दिल्लीतून परत येताच 'या' 4 मंत्र्यांची पडणार विकेट?
मुंबई : खरा पंचनामा
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्ली दौऱ्यात फडणवीस यांनी अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत.
यामध्ये भारतीय जनता पार्टीचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च नेते म्हणजेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचाही समावेश आहे. एकीकडे फडणवीसांच्या भेटीगाठी सुरु असतानाच फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यानंतर राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मोठा फेरबदल होणार की काय? अशी शंका उपस्थित केली जात आहे. राज्यसभेचे खासदार आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी अशापद्धतीची शक्यता व्यक्त केली आहे.
"मंत्रिमंडळात कोणाला ठेवायचा आणि कोणाला काढायचे हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. तरी रिमोट कंट्रोल अमित शहा यांच्याकडे आहे. मंत्रिमंडळात गोंधळाचे वातावरण सुरू आहे. मी काही दिवसापासून पाहत आहे. चार मंत्री जाणार आहेत," असं म्हणत संजय राऊत यांनी थेट चार मंत्र्यांची नावं घेतली आहेत.
माणिकराव कोकाटेंना खातं बदल करुन मंत्रिमंडळात कायम ठेवलं जाईल असा उल्लेख करत प्रश्न विचारण्यात आला असता राऊत यांनी, "या सगळ्या अफवा आणि शक्यता आहेत. त्यांना काढावे लागेल. अजित पवार यांना देखील ही मान्य आहे का? अनेक नमुने तुम्ही मंत्रिमंडळात घेतले आहेत," असं राऊत म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस हे मंत्रिमंडळातील काही सहकाऱ्यांबद्दल नाराज असून त्यांनी याबद्दल एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना कल्पना दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. आता ही नाराजी फडणवीस केंद्रातील वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहचवल्यानंतर पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस हे मंत्रिमंडळातील काही सहकाऱ्यांबद्दल नाराज असून त्यांनी याबद्दल एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना कल्पना दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. आता ही नाराजी फडणवीस केंद्रातील वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहचवल्यानंतर पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.