धनंजय मुंडेंना संपवून पोटनिवडणुकीचा कट?
बाळा बांगर यांचा वाल्मिक कराडविरुद्ध धक्कादायक खुलासा
बीड : खरा पंचनामा
बीड जिल्ह्यातील परळी येथे महादेव मुंडे खून प्रकरण आणि मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी परळी-अंबाजोगाई महामार्गावर कन्हेरवाडी आणि भोपळा येथील ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात मयत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि वाल्मिक कराड यांचे माजी सहकारी बाळा बांगर सहभागी झाले. यावेळी बांगर यांनी वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर आणि धक्कादायक आरोप केले, ज्यामुळे बीडच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
बाळा बांगर म्हणाले की, सदर प्रकरणात बोलू नको असे दबाव माझ्यावर येत होता. मात्र, त्यांना माहित नव्हतं की, मी या प्रकरणातील जबाब दिला. मी घाबरणार नाही, माघारही घेणार नाही. परळीला वाल्मिक कराडने कीड लावली आहे. मीच फरार होतो, मी म्हणून या प्रकरणात मला बोलायला उशीर लागला. प्रशासनाने वाल्मिक कराड आणि टोळीला अभय दिले. आता वाल्मिक कराड कधी बाहेर येणार नाही, असं बाळा बांगर यांनी म्हटले आहे.
काल रेकॉर्डिंग व्हायरल झाली
पुढे बोलताना म्हणाले की, काल रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती माझ्या पत्नीने सांगितले की, ती रेकॉर्डिंग मी व्हायरल केली नाही. आता या रेकॉर्डिंग प्रकरणाची सीडीआर काढावेत म्हणून मी पण उपोषणाला बसणार आहे. वाल्मिक कराडच्या टोळीमध्ये काही महिलाही सक्रिय होत्या. माझ्याकडे वाल्मिक कराडचे सगळे पुरावे आहेत. पुढच्या महिन्यात मी पत्रकार परिषद घेणार आहे. मुंडे हत्या प्रकरणातील कराड टोळी जेरबंद झाली पाहिजे, असंही बांगर यांनी यावेळी सांगितले.
वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांच्या वाईटावर होता. मुंडेंना संपवून कराड याला पोटनिवडणूक घ्यायची होती, असा दावाही बाळा बांगर यांनी केला आहे. त्यांच्या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. धनंजय मुंडे यांचे पीए प्रशांत जोशी यांना मारण्याचा कट देखील वाल्मिक कराड यांनी रचला होता, असा आरोप देखील बाळा बांगर यांनी केला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.