चेन स्नॅचिंग करणाऱ्या तिघांना अटक : तीन गुन्हे उघड
6 लाखांचे दागिने जप्त : सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
कडेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत चेन स्नॅचिंग करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दोन दुचाकी, चोरीचे दागिने असा 6 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली.
सुधाकर अशोक मोहिते (वय ३९, रा. कोतीझ, ता. कडेगांव), कादर शरीफ काझी (वय २८, रा. अंबक, ता. कडेगांव), प्रकाश श्रीरंग जाधव (वय ३६, रा. माधळमुठी, ता. खानापुर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दि. 24 एप्रिल रोजी हिंगणगाव बुद्रुक येथील पार्वती यांच्या गळ्यातील दागिने लंपास करण्यात आले होते. यातील संशयितांना पकडण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे पथक तयार केले होते. पथकाला हा गुन्हा सराईत गुन्हेगार मोहिते, काझी, जाधव यांनी केल्याची तसेच ते कडेगाव-कडेपूर रस्त्यावर थांबल्याची माहिती मिळाली.
पथकाने तेथे सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्यांनी तीन गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी, चोरीचे दागिने असा 6 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. तिघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर कडेगाव, आटपाडी, इस्लामपूर, विटा, चिंचणी अंबक, तासगाव, कोकरूड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. तिघांना कडेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन, उदय साळुंखे, संकेत मगदूम, अतुल माने, हणमंत लोहार, सोमनाथ गुंडे, करण परदेशी, अजय पाटील, अभिजित पाटील, सोमनाथ पतंगे, प्रमोद साखरपे, सुनिल जाधव, अभिजीत ठाणेकर, रोहन घस्ते यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.