Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मंत्री प्रताप सरनाईकांच्या स्वागतासाठी लावलेले 8 ते 10 बॅनर कार्यकर्त्यांनीच फाडले

मंत्री प्रताप सरनाईकांच्या स्वागतासाठी लावलेले 8 ते 10 बॅनर कार्यकर्त्यांनीच फाडले

धाराशिव : खरा पंचनामा

राज्याचे परिवहन मंत्री आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक  सध्या जिल्हा दौऱ्यावर असून, आज उमरगा येथील बस स्थानकाच्या भूमिपूजनासाठी त्यांचे आगमन होत आहे. त्यांच्या स्वागतासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बॅनर लावून जोरदार तयारी केली होती. मात्र, बॅनरवर काही स्थानिक नेत्यांचे फोटो न लावल्यामुळे शिवसैनिकांमध्येच वाद निर्माण झाला आणि हे बॅनर कार्यकर्त्यांनीच फाडल्याची घटना घडली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बॅनरवर शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची मुलगी आकांक्षा चौगुले आणि माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचे पुत्र किरण गायकवाड यांचे फोटो न लावल्यामुळे नाराजी निर्माण झाली. दोघेही पक्षाच्या मराठवाडा युवा विभागात महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत.

आकांक्षा युवती सेना निरीक्षक आणि किरण युवा सेना निरीक्षक म्हणून आहेत. शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख भगवान देवकाते यांच्या पुढाकाराने उमरगा शहरात लावण्यात आलेले ८ ते १० बॅनर या वादातून फाडण्यात आले. यामुळे कार्यक्रमाच्या आधीच वातावरण तणावपूर्ण बनले आहे.

दरम्यान, हे बॅनर कोणी फाडले याचा शोध उमरगा पोलिस घेत आहेत. बॅनर फाडण्याच्या प्रकारामुळे स्थानिक राजकारणात उलथापालथ होताना दिसत आहे. विशेष म्हणजे, पालकमंत्री सरनाईक यांच्या दौऱ्याकडे माजी आरोग्यमंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांनी पुन्हा एकदा दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्याचा दौरा असतानाही सरनाईक यांनी सावंत यांच्या मतदारसंघात न फिरकता ते टाळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.