Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महिला ASI च्या जीवावर बेतलं लिव्ह इन रिलेशनCRPF जवानाने गळा दाबून केली हत्या

महिला ASI च्या जीवावर बेतलं लिव्ह इन रिलेशन
CRPF जवानाने गळा दाबून केली हत्या

कच्छ : खरा पंचनामा

गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका सीआरपीएफ जवानाने महिला सहाय्यक उपनिरीक्षकांची (ASI) गळा दाबून हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केलं आहे.

अरुणाबेन नातूभाई जाधव (वय २५) असं मृत सहाय्यक उपनिरीक्षकं नाव आहे. तर दिलीप डांगचिया असं आरोपीचं नाव असून त्याची पोस्टींग मणिपूरमध्ये आहे. ही घटना कच्छ जिल्ह्याच्या अंजार शहरात घडली आहे.

गुजरात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधव मूळच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यातील देरवाडा गावच्या रहिवासी होत्या आणि अंजारमधील गंगोत्री सोसायटी-२ मध्ये राहात होत्या. या दरम्यान दिलीप आणि अरुणाबेन यांची मैत्री झाली आणि दोघं पुढे एकमेकांच्या प्रेमात अडकले. त्यानंतर दोघं लिव्ह इन रिलेशनमध्ये राहात होते. अनेक वर्षे दोघं रिलेशनमध्ये राहिले होते. लवकरच दोघं लग्न करणार होते.

मात्र शनिवारी काही कारणास्तव दोघांमध्य वाद झाला आणि याच रागातून दिलीपने अरुणाबेनची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर स्वतः पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केलं. पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली. सकाळी १० पर्यंत तो मृतदेहासोबत होता. त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान या घटनेनंतर गुजरातमध्ये खळबळ माजली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.