सांगलीत गुंड अजय कांबळेच्या भावाची गेम
वर्चस्ववादातून अल्पवयीन पोरांनी केला निर्घृण खून
सांगली : खरा पंचनामा
सांगलीतील वाल्मिकी आवास घरकुल योजना परिसरातील वर्चस्व वादातून गुंड अजय कांबळे याच्या भावाचा गेम करण्यात आला. शनिवारी दुपारी ही घटना घडली. वाल्मिकी आवास परिसरात वर्चस्व कोणाचे यावरून अल्पवयीन पोरांनी एडक्याने सपासप वार करत खून केला. याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सौरभ बापू कांबळे (वय 20) असे खून झालेल्याचे नाव आहे. गुंड अजय कांबळे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, लूटमार, चोरी, घरफोडी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सध्या तो कारागृहात आहे. त्याचा भाऊ मृत सौरभ सांगलीतील जुना बुधगाव रस्ता परिसरातील वाल्मिकी आवास घरकुल योजना परिसरात रहात होता.
शनिवारी दुपारी तो याच परिसरात मित्रांशी बोलत बसला होता. त्यावेळी त्या परिसरातील वर्चस्व वादातून त्यांच्यात वाद झाला. त्यातून त्याच्याच अल्पवयीन मित्रांनी त्याच्यावर एडक्याने सौरभच्या मानेवर, पायावर, पोटावर वार केले. तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर हल्लेखोर तेथून पळून गेले.
घटनेची माहिती मिळताच एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आला. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.