अॅड विकास पाटील-शिरगांवकर यांची विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचे बरोबर पुन्हा कायदेशीर खडाजंगी
अनिकेत कोथळे खून प्रकरण
सांगली : खरा पंचनामा
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी युवराज कामटेचा उलट तपास संपविला. मात्र सदर उलटतपासामध्ये सरकार पक्षा कडून असंयुक्तिक प्रश्न विचारेले मात्र ॲड. विकास पाटील शिरगांवकरांनी त्यास हरकत घेतली व प्रश्न कसे संयुक्तिक नाहीत हे न्यायालया समोर पटवून दिले. सबब ते प्रश्न न्यायालयाने घेतले नाही.
ॲड उज्ज्वल निकम सरांनी ॲड विकास पाटील-शिरगांवकरांनी तुम्ही हरकत मराठीत घेऊ नका इंग्रजी मध्ये घ्या, कारण साक्षीदारास उत्तर समजते, त्यावर शिरगांवकरांनी मुद्दा मांडला की माझी हरकत ही असंयुक्तिक प्रश्नावर आहे आणि ती घेतली की त्यास उत्तर सुचविले असे म्हणने चुकीचे आहे आणि मी मराठी भाषेतच हरकत घेणार एक तर मराठी भाषेस अभिजात दर्जा प्राप्त आहे आणि मला मराठी भाषेचा अभिमान आहे. व्याकरणातील अनुस्वार, स्वल्प विराम, अर्ध विराम, पुर्ण विराम हे का महत्वाचे आहे हे सांगितले आणि मी अप्पर लिप स्थिफ इंग्रजी भाषेत बोलू शकतो असे ठणकावून सांगितले.
सरकार पक्षाने आरोपीस त्यांच्या १५ सह्या असलेला कागद दाखविला त्या कागदावर दोन वेग वेगळ्या सह्या होत्या त्या सह्या तुमच्या आहेत असा सवाल विचारण्यात आला. तेव्हा युवराज कामटे यांनी त्यांच्या ७ सह्या ओळखल्या, व ८ सह्या त्यांच्या नाहीत असे उत्तर दिले व न्यायालयासमोर ५ सह्या करून दिल्या.
अरुण लाड यांना स्टेशन डायरी लिहली, या प्रश्नावर बचाव पक्षाने हरकत घेतली व ते प्रश्न बदलावी लागला व त्या प्रश्नावर उत्तर आले की मला माहीत नाही.
गु. र. क्रमांक २३८/२०१७ चा तपास तुमच्याकडे होता?
उत्तर : तो तपास माझे कडे नव्हता,
रिमांड रिपोर्टवर तुमची सही आहे
खोटे आहे ती सही माझी नाही
तुम्हाला ६/११/२०१७ रोजी रात्री १२.४५ वा डिवायएसपी दिपाली काळे यांचा फोन आला होता?
उत्तर : नाही.
तुम्ही व डिवायएसपी दिपाली काळे असे पोलीस ठाण्यातून बाहेर पडला?
उत्तर : नाही
डिवायएसपी दिपाली काळे यांनी फोन करून विचारले की अनिकेत कोथळे व अमोल भंडारे कुठे आहेत?
उत्तर : खोटे आहे,
डिवायएसपी दिपाली काळे यांना तुम्ही फोन करून सांगितले की अमोल भंडारे माझे जवळ आहे?
उत्तर : खोटे आहे.
विशेष सरकारी वकिलांनी आरोपीस तू अनिकेत कोथळेचा खून करून सुध्दा तू खोटी उत्तरे देतोस असे दरडावणीच्या भाषेत प्रश्न विचाराला
तेव्हा ॲड विकास पाटील -शिरगांवकरांनी सक्त हरकत घेतली व त्यास सडेतोड उत्तर दिले की,’खून करून सुद्दा तू खोटी उत्तरे देतोस, हा प्रश्नच चुकीचा आहे, कारण एक तर तो कंपांउड प्रश्न आहे व तू खून करून सुध्दा हा शब्द चुकीचा आहे कारण खून आरोपीने केला आहे, की नाही हे पुरावा सांगतो व ते न्यायालय ठरवेल, सरकारी वकील तुम्हाला ते ठरविण्याचा अधिकार नाही, आपण जो पुरावा समोर आणाला आहे ती खरा आहे की नाही हे न्यायालयासमोर येणारच आहे, तसेच न्यायालयासमोर कोणालाही अरेतुरे बोलायचे नसते व दरडावणीची भाषाही वापरायची नसते,असे भर न्यायालयात ६०/७० वकिलांसमोर विशेष सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांना रोखठोक सांगितले, त्यावर कामटे खोटा आहे असा पुन्हा वाक्य प्रचार केल्यावर ॲड विकास पाटील- शिरगांवकरांनी तपासाची कागदपत्रं कोण खोटे आहे हे ठरवणार आहे, तुम्हाला उत्तरे मिळत नाहीत तुम्ही चिडू नका असे वारंवार कायदेशीर वाद झाले.
बचाव पक्षाने जो कागदोपत्री पुरावा शाबित केला त्यावर सरकार पक्षाचा उलट तपास पु्र्ण झाला सदरकामी बचाव पक्षा तर्फे डिवायएसपी सिंधुदुर्ग व पोलीस निरीक्षक सांवंतवाडी यांचे कडून मिळालेल्या माहितीची कागदपत्रांचा महत्वाचा पुरावा बचाव पक्षाचे वकील विकास पाटील -शिरगांवकर दि.२१/७/२०२५ रोजी समोर आणणार आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.