अग्नी प्रतिबंध सुरक्षा योजना राबवण्यासाठी धोरण आखण्यासाठी पंतप्रधानाना साकडे घाला
अॅड उज्ज्वल निकम यांना ॲड विकास पाटील -शिरगांवकरांनी दिले निवेदन
सांगली : खरा पंचनामा
अॅड उज्ज्वल निकम सरांना ते राज्यसभेवर खासदार नियुक्त झाले बाबत ॲड विकास पाटील -शिरगांवकरांनी शुभेच्छा पत्र दिले व पंतप्रधान महोदयांना आपत्ती व्ववस्थापन कायद्यानुसार शासकीय इमारती, न्यायालये तसेच घरातील स्वयंपाक घर, रूग्णालये, शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे,औद्योगिक क्षेत्रामध्ये मानव निर्मित आग दुर्घटना टाळणारी सुरंक्षा यंत्रणा लावणे बाबत कायदेशीर सुरक्षा योजना राबविण्याचे धोरण आखावे असे निवेदन सांगली येथील तमाम वकिलांचे समोर दिले. ते ॲड उज्ज्वल निकम सरांनी स्वीकारले आहे.
न्यायालयासमोर पक्षकारांसाठी सडेतोडपणे बाजू मांडणारे ॲड विकास पाटील-शिरगांवकर हे वकिली सोबत जनहितार्थ अग्नी प्रतिबंध सुरक्षा हा विषय किती महत्वाचा आहे हा मुद्दा सुध्दा ते नेहमी मांडत आले असून त्या विषयाचा एक वेगळा पैलू त्यांच्याकडे आहे पाहण्यास मिळाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.