Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'अमित शहांना भेटण्यासाठी आधी लोक माझ्याकडे पाहायचे, पण आता मलाही...'

'अमित शहांना भेटण्यासाठी आधी लोक माझ्याकडे पाहायचे, पण आता मलाही...'

पुणे : खरा पंचनामा

पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना अनेपक्षितरित्या केंद्रात राज्यमंत्रिपद मिळालं. मोहोळ यांना थेट केंद्रात राज्यमंत्रिपद मिळेल याचा अंदाज कोणालाच नव्हता. तसेचआता मलाही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटण्यासाठी मुरलीधर मोहोळ यांच्याशी बोलावं लागतं, असं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमादरम्यान सांगितले.

केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक विभाग राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने "24 तास जनसंपर्क कार्यालय" शुभारंभ व प्रथम वर्ष कार्यअहवाल प्रकाशन तसेच कोरोना काळातील अनुभव कथन करणारे " प्रथम माणूस" पुस्तक प्रकाशन या कार्यक्रमांचे आयोजन शनिवारी बालगंधर्व रंगमंदिर येथे करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पक्ष प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, केंद्रामध्ये मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपद मिळणं हे अनपेक्षित होतं, कारण खासदार झाल्यानंतर मध्ये पाच-दहा वर्ष जावी लागतात. त्यानंतर मंत्रिपद मिळत असतं. मात्र, मोहोळ हे भाग्य घेऊनच जन्माला आले आहेत. नगरसेवक, स्थायी समिती सदस्य, नंतर अध्यक्ष, महापौर त्यानंतर त्यांनी डायरेक्ट उडी मारली आणि ते खासदार झाले. त्यानंतर लागणारं वेटिंग पिरेड चुकवत ते केंद्रात मंत्रीही झाले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केंद्रात दोन मंत्रिपद आहेत, तरीदेखील ते वेळ काढून शहरातील प्रश्नांवरती तोडगा काढण्यासाठी जनसंपर्क ठेवतात. त्यामुळे आण्णा माणसातला नेता आहेत, असं म्हणावं लागेल.

मी गुजरातमध्ये दहा वर्ष काम केले असल्याने अमित शहा यांना भेटण्यासाठी आधी लोक माझ्याकडे पाहायचे. पण आता मलाही अमितभाईंसाठी अण्णाला भेटावे लागते, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

मुरलीधर मोहोळ आता अण्णा झाले आहेत, आपल्याला आता लक्षात आले पाहिजेत. ते केंद्रीय मंत्री झाले आहेत. त्यांना केंद्राची कामं आहे, पण त्यांच्याकडून पुण्यातील लोकांच्या फार अपेक्षा आहेत. त्यामुळे अण्णाला सूचना करतो की, पुणेकरांशी असलेली नाळ तोडू नका, काम करत राहा असा सल्लाही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.