Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'..... तर उद्धव ठाकरेंनाही सोबत घेऊ'

'..... तर उद्धव ठाकरेंनाही सोबत घेऊ' 

मुंबई : खरा पंचनामा

राज्यात यावर्षी होणाऱ्या स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक विशेष महत्त्वाची आहे. मुंबई महापालिका जिंकण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन नेते एकत्र येणार अशी चर्चा आहे.

दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी तसे संकेतही दिले आहेत. त्याचवेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी उद्धव ठाकरेंनाच सोबत घेण्याची तयारी दाखवली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीमध्ये त्यांनी हे मोठं वक्तव्य केलं आहे.

अजित पवार ज्याप्रमाणे आमच्या विचारधारेबरोबर जोडले गेले, तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राष्ट्रहितचीी विचार करत कुणी आमच्यासोबत येत असेल तर भविष्यात उद्धव ठाकरेंनाही सोबत घेऊ असं मोठं वक्तव्य रविंद्र चव्हाण यांनी केलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी आमचे विचार सोडले. ते आता जनसुरक्षा विधेयकाला विरोध करत वेगळी भूमिका घेत आहेत. जे चांगलं आहे, त्याला चांगलं म्हंटलं पाहिजे. पण ते विरोधासाठी विरोध करत आहेत, अशी टीकाही चव्हाण याांनी उद्धव ठाकरेंवर केली.

उद्धव ठाकरे यांनी त्यांची आधीची भाषा बदलली. आम्ही आमची भाषा आणि लाईन कधीच बदलली नाही. कुठेतरी इगो बाजूला ठेवून बाळासाहेबांच्या विचारांवर ठाकरे यांनी जायला हवं, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. दोन ठाकरे एकत्र येतील की नाही हे तेच ठरवतील. आम्ही आमचं संघटन वाढवू, ताकद वाढवू असं चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केलं.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.