मी ३ खुनांचा साक्षीदार, महादेव मुंडेंचं कातडं, हाड अन् रक्त कराडसमोर टेबलवर ठेवलेलं
जुन्या साथीदाराचे खळबळजनक दावे
बीड : खरा पंचनामा
मस्साजोगचे सरपंच संतोष देमशुख यांच्या हत्या प्रकरणातीली मुख्य आरोपी वाल्मीक कराडच्या जुन्या साथीदाराने खळबळजनक असे खुलासे केले आहेत. वाल्मीक कराडचा जुना सहकारी विजयसिंह बांगर यानं धक्कादायक असे आरोप पत्रकार परिषदेत केले.
माझ्यासमोरच वाल्मीक कराडनं तिघांना मारलं असून त्याचा मी साक्षीदार आहे असं विजयसिंह बांगरने म्हटलंय.
महादेव मुंडे यांची हत्या केल्यानंतर वाल्मीक कराडच्या टेबलवर मुंडेंचं कातडं, हाड आणि रक्त आणून ठेवलेलं. तर संतोष देशमुख यांच्या हत्येआधी मला एका सरपंचाच्या खुनात अडकवणार अशी धमकीही दिली होती. याबाबतचे सर्व पुरावे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलिसांकडे देणार असल्याचं विजयसिंह बांगरने म्हटलंय.
वाल्मीकसोबत बिनसल्यानंतर विजयसिंह बांगर बाजूला झाले होते. पण त्यानंतरही वाल्मीकने बांगरला सोबत काम करण्यास सांगितलं होतं. पण बांगरने नकार दिल्यानं दोघातले वाद वाढले. आता बांगरने पत्रकार परिषद घेत अनेक खळबळजनक खुलासे केलेत. यात महादेव मुंडे यांच्या हत्येनंतर त्यांची कातडी, हाडं, रक्त कराडच्या टेबलवर ठेवलं होतं असा धक्कादायक दावा बांगरने केलाय.
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या एक ते दीड वर्षे आधी महादेव मुंडे यांचा निघृण खून झाला होता. परळीतल्या तहसीलदार कार्यालयासमोर असणाऱ्या मैदानात ही हत्या झाली होती. हत्येनंतर पोलिसांना रात्री गाडी सापडली पण तिथून ५० मीटर अंतरावर असलेला मृतदेह दिसला नव्हता. दुसऱ्या दिवशी मृतदेह आढळून आला होता.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.