"छाती ठोकून सांगतो, होय. गुवाहाटीला गेलो"
मुंबई : खरा पंचनामा
प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी एका कार्यक्रमात खास मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यावर परखडपणे आपलं मत व्यक्त केलंय. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी बच्चू कडू पदयात्रा काढणार आहे. 7 जुलै ते 14 जुलै अशी त्यांची पदयात्रा असणार आहे. नुकतंच केलेल्या उपोषणात तिन ते चार किलो वजन कमी झाल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं आहे.
जनसामान्यांचा एकंदरित सहभाग वाढला होता. वाढता पाठिंबा पाहता सरकारला निर्णय घ्यायला भाग पडलं. सर्वच पक्षांनी पाठिंबा दिला. दहा ते पंधरा खासदार, जवळपास पन्नास आमदारांनी पाठिंबा दिला होता. शेतकरी मजुरांच्या मुद्द्यावर समाज एकत्र येईल का, असा सवाल नेहमीच उपस्थित होता. परंतु आम्ही सफल झालो आहेत. तुम्ही निवडणुकीत मतं कोणालाही द्या, पण मजूर म्हणून एकत्र आलं पाहिजे, अशी भूमिका बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं आहे.
आज लुटीची परिस्थिती आहे. खरे मुद्दे बाजूला ठेवून धर्म, असे मुद्दे मांडले जातात. जितक्या वेळी लुटलं. तितक्या वेळी कर्जमाफी द्यायची. काँग्रेसपासून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. सोयाबीनचे भावची शिफारस सात हजार रूपये पर क्विंटल झाली. केंद्राने पाच हजार रूपये भाव जाहीर केला. आम्हाला एका क्विंटलमागे दोन हजार रूपये घाट्याने व्यवहार करावा लागत आहे. लुटलं किती अन् दिलं किती? असा सवाल देखील बच्चू कडू यांनी उपस्थित केलाय.
जगाच्या व्यासपीठावर शेतकरी मरतच आहे. अमेरिकेसारखा कायदा आपण करावा. बजेटच्या साठ टक्के निधी हा शेतीवर खर्च करावा. माझं प्रत्येक भाषण शेतकरी अन् दिव्यांगाशिवाय संपत नाही. ते मला भोगावं लागलं आहे. पैसा गरिबांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करतोय. साडेतीनशे गुन्हे माझ्यावर आंदोलनासाठी दाखल आहेत. सीएम टू पीएम ही आसूड यात्रा आम्ही मोदींच्या गुजरातपर्यंत धडकवली होती.
एकनाथ शिंदेसोबत गुवाहाटीला गेले होते, यावर प्रश्न विचारला. यावर बोलताना बच्चू कडू यांनी म्हटलंय की, हे प्रश्न गरिब माणसाला का विचारता? गरिबाची पोरगी पळून गेली की ते लफडं होतं. अन् श्रीमंताची पोरगी पळून गेली की लफडं होतं. गुहावटीला गेलो नसतो, तर दिव्यांग मंत्रालय हाती भेटलं नसतं. छाती ठोकून सांगतो, होय. गुवाहटीला गेलो होतो. आताही जर बजेटमधील पन्नास टक्के शेतकऱ्यांना देत असाल तर कुठेही जावू, उडी टाकू असं बच्चू कडू यांनी म्हटलंय.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.