अनैतिक संबंधास विरोध केल्याने दरोडा टाकायला लावणाऱ्यासह दोघांना अटक
उटगीसह दोन गुन्हे उघड : सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
अनैतिक संबंधास विरोध करून दमदाटी करणाऱ्याच्या उटगी (ता. जत) येथील वस्तीवरील घरावर दरोडा टाकायला लावणाऱ्यासह एका दरोडेखोराला अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आणण्यात यश आल्याची माहिती एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली.
सुरेश मनोहर काळे (वय ५५, रा. सांगली रोड तांडा, जत), पप्पु सुरेश परीट (वय ५५, दोघे रा. परीट वस्ती, उटगी, ता. जत) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दि. 21 जुलै रोजी रात्री दोन वाजता चांदसाब मुल्ला यांच्या वस्तीवरील घरात सात ते आठ जण त्यांच्या घरात दार फोडून घुसले. चांदसाब आणि त्यांच्या भावाला हत्यारांचा धाक दाखवत मारहाण करून त्यांच्या घरातील दागिने जबरदस्तीने काढून घेऊन पसार झाले. याबाबत उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील संशयितांना तातडीने पकडण्याच्या सूचना कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी दिल्या होत्या. त्यानुसार निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक पंकज पवार यांचे पथक तयार केले होते.
पथकातील संदीप नलवडे यांना हा दरोडा सुरेश काळे याने हा दरोडा टाकल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. पथकाने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्याने पप्पू परीट याच्या सांगण्यावरून हा दरोडा टाकल्याची कबुली दिली. त्यानंतर पथकाने परीट याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यावर त्याने मुल्ला हा त्याच्या अनैतिक संबंधाला विरोध करत होता तसेच दमदाटी करत होता त्यामुळे त्याला धडा शिकवण्यासाठी दरोडा टाकायला काळे याला सांगितल्याची कबुली दिली. दोघांना अटक करून उमदी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, सहायक निरीक्षक पंकज पवार, उमदीचे सहायक निरीक्षक कांबळे, संदीप नलावडे, अनिल कोळेकर, अमर नरळे, सतिश माने, सागर लवटे, संदीप गुरव, महादेव नागणे, सागर टिंगरे, मच्छिंद्र बर्डे, अमसिध्दा खोत, सोमनाथ गुंडे, उदय माळी, संदीप गुरव, अमरिशा फकीर, विक्रम खोत, केरूबा चव्हाण, गणेश शिंदे, सुशांत चिले, सायबर पोलीस ठाणेकडील अभिजित पाटील, अजित पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.