"जय गुजरात..."
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पुण्यात घोषणा
पुणे : खरा पंचनामा
पुण्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दौऱ्यावर आले आहेत. यावेळी गुजरात भवन येथे कार्यक्रमामध्ये अमित शाह यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना भाषण दिले. भाषणाच्या शेवटी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'जय गुजरात' अशी घोषणा दिली आहे. यामुळे आता राज्यामध्ये वाद पेटणार आहे.
भाषणाच्या शेवटी एकनाथ शिंदे यांनी 'जय महाराष्ट्र, जय हिंद आणि जय गुजरात' अशी घोषणा दिली. यामुळे आता वादाला तोंड फुटले आहे. राज्यामध्ये हिंदी विरुद्ध मराठी असा वाद सुरु असताना एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात अशी घोषणा दिल्याने वाद निर्माण झाला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषणामध्ये म्हणाले की, 'आजचा दिवस संपूर्ण गुजरात समाजासाठी महत्त्वपूर्ण आहे. याठिकाणी मी भगत येत होतो. येथे काहीही कमी नाही. तुम्ही सगळे लक्ष्मीपुत्र आहात. पैसे कमी पडण्याची गोष्टच नाही. त्यामुळे तुमचे स्वप्न पूर्ण झाले. ज्या कामांचे भूमिपूजन हे पंतप्रधान मोदी करतात ते काम लवकर पूर्ण होते, अशा भावना एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या. आमच्यासाठी मोदीजी आणि अमित भाई वेगळे नाही. मोदींची सावली हे अमित शाह आहेत. अमित शाह यांचा स्पर्श झाल्यानंतर त्या कार्याचे सोने होते,' अशा भावना एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या.
पुढे ते म्हणाले की, 'मला आनंद दिघे यांनी सांगितलेली गोष्ट आठवत आहे. कोणतेही शहरं असो, कोणते मोठे गृहसंकुल असो किंवा कोणतेही नवे शहर तयार होवो. पण जो पर्यंत तिथे बाजारपेठ तयार होत नाही तो पर्यंत त्या शहराची शोभा वाढत नाही. आणि ही बाजारपेठ बसवणारे तुम्ही व्यावसायिक लोक आहात. त्यामुळे तुमच्या शिवाय कोणत्याही शहराची शोभा वाढत नाही,' असे मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
पुण्यातील कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा त्यांच्या बंडखोरीच्या आठवणी सांगितल्या आहेत. ते म्हणाले की, 2022 तुम्हाला माहिती आहे. राज्यामध्ये दुकानं, घरं, मंदिरं, सण आणि पूर्ण शहरे बंद होती. यावेळी लोक स्पीड ब्रेकर आणत होती. या वेळी मी गर्वाने सांगतो की आमच्यासोबत नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन तर होते पण माझ्या पाठीशी अमित शाह यांचा भक्कम पाठिंबा होता. नाही तर हे काम करणे सोप्पे होते का? पण जेव्हा राज्याच्या विकासाचा मुद्दा येतो तेव्हा अशा गोष्टी कराव्या लागतात. त्यामुळे मी अमित भाई यांचे खूप धन्यवाद मानतो की त्यांनी मला पाठिंबा दिला. आता महायुती एक टीम म्हणून विकास करत आहे, अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी पुन्हा बंडखोरीच्या आठवणी सांगितल्या.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.