'तर मुंबईवर हल्ला झालाच नसता'
अभिनेता संजय दत्त बाबत उज्वल निकम यांचा खळबळजनक खुलासा
मुंबई : खरा पंचनामा
देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू U Blast यांच्या शिफारशीने विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची राज्यसभेवर वर्णी लागली आहे. राज्यसभेवर खासदारकी मिळवून उज्वल निकम यांनी राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. खासदारकी मिळाल्यानंतर उज्वल निकम यांनी एका वृत्तवाहिनीला विशेष मुलाखत दिली. ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या वकिलीच्या कार्यकाळाचा प्रवास मांडला. यावेळी बोलताना उज्वल निकम यांनी अभिनेता संजय दत्तचे नाव घेत 267 जणांचा मृत्यू झालेल्या 1993च्या मुंबई बॉम्ब स्फोटाबाबत सर्वात मोठे विधान केले.
याबाबत बोलताना उज्वल निकम म्हणाले की, "संजय दत्त त्यावेळी निर्दोष होता आणि त्यांनी शस्त्रे ठेवली होती कारण त्याला बंदुकांची आवड होती. "कायद्याच्या दृष्टीने त्यांनी गुन्हा केला होता. पण तो एक साधा माणूस आहे. मी त्याला निर्दोष मानतो. मला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे. 12 मार्च रोजी झालेल्या बॉम्बस्फोटांच्या काही दिवस आधी, एक व्हॅन संजय दत्तच्या घरी आली. ती हँडग्रेनेड, एके-47 सारख्या शस्त्रांनी भरलेली होती, अबू सालेम (गुंड दाऊद इब्राहिमचा साथीदार) ती घेऊन आला होता. संजयने काही हँडग्रेनेड आणि बंदुका घेतल्या. नंतर त्याने ते सर्व परत केले आणि फक्त एके-47 सोबत ठेवली. जर त्याने त्यावेळी पोलिसांना माहिती दिली असती तर पोलिसांनी तपास केला असता आणि मुंबई बॉम्बस्फोट कधीच झाला नसता"
त्यांनी सांगितले की "संजय दत्तच्या वकिलाला याबद्दल देखील सांगितले होते की त्याच्याकडील एके-47 ने कधीही गोळीबार झाला नाही. त्याची उपस्थिती आणि एक बंदी घातलेले शस्त्र त्याच्याकडे असणे ही "एक गोष्ट" आहे. परंतु पोलिसांना माहिती न देणे हे स्फोट घडवून आणण्याचे कारण होते. यावेळी उज्वल निकम यांनी शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत अभिनेता संजय दत्तला दोषी ठरवल्यानंतर त्याने केलेले कोर्टातील कधीही समोर न आलेले एक संभाषणही सांगितले.
" शिक्षा झाल्यानंतर मी त्याचे भाव बदलताना पाहिले. मला वाटले की तो धक्काबुक्की करण्याच्या तयारीत आहेत. तो निकाल स्वीकारू शकला नाही आणि तो घाबरलेला दिसत होता. तो साक्षीदार चौकटीत होता आणि मी जवळच होतो आणि मी त्यांच्याशी बोललो. तुम्हाला आठवेल की तो शांत बसला आणि नंतर निघून गेला," असे त्यांनी पुढे सांगितले. मी संजयला सांगितले, 'संजय असे करू नको. मीडिया तुला पाहत आहे. तू एक अभिनेता आहेस. जर तू शिक्षेला घाबरलेला दिसत असशील तर लोक तुला दोषी समजतील. तुला अपील करण्याची संधी आहे, असा मोठा खुलासाही उज्वल निकम यांनी केला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.