तरुणीने खोटी तक्रार दाखल करण्यापूर्वी प्राध्यापिकेचे घेतले होते मार्गदर्शन?
कोंढवा प्रकरणात धक्कादायक वळण
पुणे : खरा पंचनामा
पुण्यात गाजलेल्या कोंढवा येथील कथित लैंगिक अत्याचार प्रकरणाला आता अनपेक्षित वळण लागले आहे. एका उच्चभ्रू सोसायटीतील तरुणीने दाखल केलेली तक्रार खोटी असल्याचे उघड झाल्यानंतर, समोर आलेल्या माहितीनुसार तक्रारदार तरुणीने तक्रार दाखल करण्यापूर्वी आपल्या एका प्राध्यापिकेचे मार्गदर्शन घेतल्याचे समोर आले आहे. ज्यामुळे या प्रकरणाची गुंतागुंत वाढली आहे.
पुण्यातील कोंढवा येथील खोट्या लैंगिक अत्याचार प्रकरणात आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. उपायुक्त शिंदे यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की, ही प्राध्यापिका तक्रारदार तरुणीच्या तक्रारीपूर्वीपासून तिच्या संपर्कात होती. तपासात असे उघड झाले आहे की, तक्रार दाखल करण्यापूर्वी तरुणीने या प्राध्यापिकेकडून मार्गदर्शन घेतले होते. ही प्राध्यापिका तक्रारदार तरुणीची मैत्रीण तसेच मार्गदर्शकही होती. या प्रकरणाच्या तपासात गुंतलेल्या पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, एका खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयातील महिला प्राध्यापिकेचा जबाब नोंदवण्यात आला आहे. तक्रार कशी दाखल करावी आणि तपास अधिकाऱ्यांशी कसे बोलावे, याबद्दल तरुणीने या प्राध्यापिकेकडून माहिती घेतली होती.
पोलिसांनी हे देखील स्पष्ट केले आहे की, गरज पडल्यास या प्राध्यापिकेला पुन्हा चौकशीसाठी बोलावले जाईल. या नवीन माहितीमुळे प्रकरणाच्या तपासाची दिशा बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे, कारण यातून काही नवीन धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.