हो, मी पाकिस्तानी सैन्याचा विश्वासू एजंट.; 26/11 हल्ल्यावेळी मुंबईतच होतो,
तहव्वुर राणाची कबुली
मुंबई : खरा पंचनामा
26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या तहव्वुर हुसेन राणा याने मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या चौकशीदरम्यान अनेक मोठे खुलासे केले आहेत.
राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) कोठडीत चौकशीदरम्यान राणाने कबूल केले की, तो पाकिस्तानी सैन्याचा विश्वासू एजंट होता, एवढेच नव्हे तर, 26/11 च्या हल्ल्यात माझा सहभाग होता. तसेच खिलाफ युद्धादरम्यान सौदी अरेबियालाही पाठवण्यात आले होते, असेही राणाने म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत इंडिया टूडेने वृत्त प्रकाशित केले आहे.
चौकशीत राणाने लष्कर-ए-तोयबा ही केवळ एक दहशतवादी संघटना नाही तर, ती हेरगिरी नेटवर्क म्हणून काम करत असल्याचे सांगितले. आपण स्वतः आणि सहकारी मित्र डेव्हिड हेडलीने पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबासोबत अनेकदा लष्करी प्रशिक्षण घेतल्याचीही कबुली दिली आहे. तहव्वुर राणा हा 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवादी डेव्हिड हेडलीचा जवळचा मित्र होता. चौकशीदरम्यान हेडलीने राणाचा उल्लेख केला होता. या हल्ल्यात 10 पाकिस्तानी दहशतवादी अरबी समुद्रमार्गे मुंबईत पोहोचले आणि त्यांनी रेल्वे स्टेशन, दोन आलिशान हॉटेल्स आणि एका ज्यू केंद्रावर हल्ला केला होता. सुमारे 60 तास चाललेल्या या हल्ल्यात 166 नागरिकांचा मृत्यू झाला होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत त्यांच्या फर्मचे इमिग्रेशन सेंटर उघडण्याची कल्पना होती आणि त्यातील आर्थिक व्यवहारदेखील व्यवसाय खर्च म्हणून केले जात होते. एवढेच नव्हे तर, 26/11 च्या हल्ल्यावेळी राणा आणि हेडली मुंबईत होते आणि आम्ही दहशतवाद्यांच्या योजनेचा एक भाग होतो अशीही कबुली राणाने दिली आहे. हल्ल्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह अन्य ठिकाणांची रेकी केल्याचेही राणाने चौकशीत सांगितले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.