Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पोलिसांचा विरोध झुगारत मालेगावात जल्लोष

पोलिसांचा विरोध झुगारत मालेगावात जल्लोष

मालेगाव : खरा पंचनामा

मालेगावच्या भिक्कू चौकात 29 सप्टेंबर 2008 रोजी रात्री 9.35 वाजता बॉम्बस्फोट झाला आणि संपर्ण देश हादरला. आज या बॉम्बस्फोटाचा निकाल लागलाय. आरोपींच्या विरोधात पुराव्यांचा अभाव असल्याने आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलीये. सर्वांची निर्दोष मुक्तता होताच मालेगावात हिंदुत्ववादी संघटना जल्लोष करताना दिसत आहेत. ढोलताशा आणि नाचून आपला आनंद हा हिंदुत्ववादी संघटनांकडून व्यक्त केला जात आहे.

एकमेकांना पेढे भरून आनंद साजरा करताना अनेक लोक दिसत आहेत. यादरम्यान पोलिसांनी कार्यकर्त्यांना फटाके फोडण्यास मज्जाव करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांची समजूत काढताना पोलिस दिसले. हिंदुत्ववादी संघटनांकडून मालेगावात मिरवणूक काढण्यात आली आहे. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे फोटो हातात घेऊन अनेकजण या मिरवणुकीत सहभागी झाल्याचे दिसत आहे.

हिंदुत्वादी संघटनांना फटाके फोडण्यास पोलिसांकडून मज्जाव करण्यात आल्यानंतर हिंदुत्वादी संघटना आक्रमक झाली. जल्लोष करतेवेळी फटाके फोडण्याचा प्रयत्न करत असताना पोलीस आणि हिंदु संघटना कार्यकर्ते यांच्या वाद झाला. पुण्यातील पतीत पावन संघटनेचे कार्यकर्ते कर्नल पुरोहित यांच्या पुण्यातील निवासस्थानाबाहेर फटाके फोडणार आहेत तसेच आनंदउत्सव साजरा करणार आहेत. हिंदुवादी संघटना जल्लोष करण्यासाठी फटाके फोडल्यावर ठाम आहे.

यासोबतच मालेगावात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या फोटोला दुग्धाअभिषेक करण्यात आला. कार्यकर्त्यांचा आनंद गगणात मावेना असे झाले आहे. पोलिसांनी मज्जाव करता देखील कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला. आजच्या या निकालाकडे फक्त राज्याच्याच नाही तर संपूर्ण देशाच्या नजरा होत्या. शेवटी तब्बल 17 वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागला आहे.

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी आपल्याला कशाप्रकारे या प्रकरणाचा त्रास झाला आणि दिला हे सांगितले आहे, यादरम्यान त्यांना रडू आले. सर्व आरोपींनी कोर्टात हात जोडून धन्यवाद मानले आहेत. आरोपींच्या विरोधात पुरावे नसल्याचे कोर्टात सांगण्यात आले. मोबाईलमध्येही काहीच सापडले नाही. फक्त संशयावर शिक्षा देता येत नसल्याचेही कोर्टाने स्पष्ट केले आहे. स्फोटामध्ये वापरण्यात आलेली दुचाकी ही साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरची असल्याचा पुरावा नसल्याचे कोर्टाने म्हटले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.