Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

वॉकी टॉकी वापरून दरोडा टाकणाऱ्या तिघांना अटक

वॉकी टॉकी वापरून दरोडा टाकणाऱ्या तिघांना अटक

पिंपरी : खरा पंचनामा

शहरातील प्रतिष्ठित आणि सुरक्षित समजल्या जाणाऱ्या निगडी प्राधिकरण परिसरात वृद्ध नागरिकाच्या घरात हातपाय बांधून, पिस्तूलाचा धाक दाखवत तब्बल ६.१५ लाख रुपयांचा ऐवज लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे.

या टोळीतील मुख्य आरोपींचा राजस्थानपर्यंत बाराशे किलोमीटर पाठलाग करत पोलिसांनी त्यांना अटक केली असून तिसऱ्या स्थानिक आरोपीला तळेगावहून पकडण्यात आले आहे. विशेष म्हणजे, गुन्हा केल्यानंतर मोबाईल लोकेशन ट्रेस होऊ नये म्हणून आरोपींनी मोबाईलऐवजी वॉकी टॉकीचा वापर केल्याचे निष्पन्न झाले आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाला यश आले आहे.

निगडी प्राधिकरण येथे १९ जुलै रोजी सायंकाळी एका जेष्ठ नागरिकाच्या बंगल्यात दरोडेखोरांनी घुसखोरी करत वृद्धाचे हातपाय बांधले, तोंडावर चिकटपट्टी लावली. त्यानंतर घरातील कपाटे उचकून ६ लाख १५ हजारांचा ऐवज लंपास केला. यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने, घड्याळ, रोख रक्कम चोरून नेली होती.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करण्यात आले होते. यामध्ये पथकाने सुमारे १२०० किलोमीटर प्रवास केला. तसेच, २०० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली.

राजस्थान येथील जयपूरमधून सुरेश लादुराम ढाका (२९, रा. दंतीवास, जि. जलौर, राजस्थान) आणि त्याचा साथीदार यांना शामनगर, जयपूर येथून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मारुती स्विफ्ट कार, चार वॉकी टॉकी, दोन मोबाईल, सोन्याचे दागिने, फिर्यादीचे पाकीट, आधार कार्ड, गाडीचे आरसी बुक असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्ह्याशी संबंधित असलेला महिपाल रामलाल विष्णोई (१९, सध्या रा. वडगाव मावळ) याला तळेगाव येथून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून फिर्यादीच्या पत्नीच्या सोन्याच्या बांगड्या, कानातले, घड्याळ आणि बनावट नंबर प्लेट जप्त करण्यात आली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.