Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाहीशिक्षण विभागाने काढले आदेश

८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही
शिक्षण विभागाने काढले आदेश

मुंबई : खरा पंचनामा

रविवारची सुट्टी आणि आषाढी एकादशीचा उत्साह संपत नाही तोच, विद्यार्थी आणि पालकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली होती. उद्या, सोमवारी शाळेची घंटा वाजेल, पण त्यानंतर लगेचच पुढचे दोन दिवस, म्हणजेच मंगळवार (८ जुलै) आणि बुधवार (९ जुलै) रोजी राज्यातील बहुतांश शाळा पुन्हा बंद राहणार आहेत. मात्र, त्यातच आता शिक्षण विभागाने पुन्हा नवीन आदेश काढले आहेत. तो म्हणजे, ८ णि ९ जुलैला राज्यातील कुठल्याही शाळा बंद राहणार नाहीय.

८ व ९ जुलैला सुट्टी कुठल्या सणामुळे किंवा नियोजित नव्हती, तर हजारो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या हक्कांसाठी पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनामुळे होती. त्यामुळे पालकांनी याची नोंद घेऊन आपलं नियोजन करावं, असं आवाहन देखील करण्यात आलं होतं. मात्र, शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांचं हित पाहता राज्यातील शाळा बंद राहणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक महेश पालकर यांनी हे आदेश काढले आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.