सुषमा अंधारेंवर मोठी कारवाई; हक्कभंग मंजूर
विशेषाधिकार समिती करणार शिक्षा?
मुंबई : खरा पंचनामा
मराठीच्या मुद्यावर उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकाच मंचावर येत आहेत. वरळीतील डोममध्ये ते मार्गदर्शन करणार आहेत. मात्र, ठाकरे बंधू एकत्र येत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या यांच्या विधासभेत हक्कभंग मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना काय शिक्षा होणार याचा निर्णय विशेषाधिकार समिती घेणार आहे. त्यामुळे सुषमा अंधारे यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे.
कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवणारे गाणे तयार केले होते. सुषमा अंधारे यांनी कुणाला कामराला पाठींबा दिला होता. कामरा याच्या जिथे शो झाला होता तेथे शिवसैनिकांनी तोडफोड केली होती. तसेच कामराच्या विरोधात अंधेरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल दाखल केला होता.
कुणाला कामराला अटकेपासून न्यायालयाने संरक्षण दिले असले तरी विधानसभेत त्याच्या आणि त्याला पाठींबा देणाऱ्या सुषमा अंधारे यांच्या विरोधात गुरुवारी हक्कभंगचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. हा मंजूर झालेल्या प्रस्ताव विशेषाधिकार समितीकडे पाठवण्यात आला आहे. त्यामुळे या दोघांना किती दिवसांचा तुरुंगावास होणार अथवा माफी देण्यात येणार याचा निर्णय विशेषाधिकार समिती घेणार आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने कुणाल कामराचा एकनाथ शिंदेंवर व्यंग करणारा व्हिडिओ शेअर केला होता. तसेच सुषमा अंधारे यांनी देखील व्हिडिओ बनवत शिंदेंची खिल्ली उडवली होती. हक्काभंगचा प्रस्ताव भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषदेत मांडला तो मंजूर झाल्यानंतर हा प्रस्ताव सभापती राम शिंदे यांनी विशेषाधिकार समितीकडे पाठवला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.