Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महादेव मुंडेंच्या केसचा तपास आता एलसीबीकडे

महादेव मुंडेंच्या केसचा तपास आता एलसीबीकडे

बीड : खरा पंचनामा

बीड जिल्ह्यातील महादेव मुंडे हत्या प्रकरणात मोठी बातमी समोर येत आहे. महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. तपासासाठी पथकं रवाना झाल्याची माहितीही समोर आली आहे. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेयांनी आज आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. त्या घटनेनंतर व्यवस्थाकामाला लागली आहे.

परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात आता ९ वी वेळ आहे तपासी अधिकारी बदलण्याची. या हत्या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख बंटेवाड यांनी दिली आहे. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी औषध प्राशन केल्याने त्यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

या सर्व घडामोडीनंतर पोलीस अधीक्षकांनी महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास आता स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. पोलीस प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे तपासाला गती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर, तपास वर्ग होताच तपासाला सुरुवात झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या संदर्भातील तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकं परळीकडं रवाना झाले आहेत.

महादेव मुंडे हत्या प्रकरणात यापुर्वी धक्कादायक खुलासे करणारे वाल्मीक कराडचे जुने सहकारी विजयसिंह बांगर यांनी जिल्हा रुग्णालयामध्ये जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी मीडियाशी बोलताना त्यांनी आज पुन्हा एकदा धक्कादायक खुलासा केला असून महादेव मुंडे हत्या प्रकरणात वाल्मिक कराडसह त्याच्या मुलाचा आणि गोट्या गितेचा हाथ असून गोट्या गिते हा सायको किलर आहे. त्याला तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेतलं पाहिजे, असं विजयसिंह बांगर यांनी म्हटलं आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.