कसबे डिग्रज येथील हॉटेल फोडणाऱ्या दोघांना अटक : तीन गुन्हे उघड
दीड लाखांचा मुद्देमाल जप्त : सांगली ग्रामीण पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज येथील हॉटेल फोडून त्यातील साहित्य लंपास करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चोरीचा दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करून तीन गुन्हे उघडकीस आणण्यात यश आल्याची माहिती सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक किरण चौगले यांनी दिली.
दिपक राजाराम माने (वय १९, रा. सांगलीवाडी), गौतम राजु काळे (वय २०, रा. शामरावनगर, महसुल कॉलनी सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दि. 23 जुलै रोजी कसबे डिग्रज येथील हॉटेल वर्षा फोडून त्यातील साहित्य लंपास केल्याची फिर्याद प्रमोद हंकारे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली होती. यातील चोरट्याना पकडण्याच्या सूचना निरीक्षक चौगले यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या.
पथकातील अक्षय माने यांना गौतम काळे हा चोरीचा गॅस सिलिंडर विक्री करण्यासाठी इनाम धामणी येथे येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यावर त्याने माने याच्या सोबत कसबे डिग्रज येथील हॉटेल फोडल्याची तसेच बुधगाव येथील आणि कळंबी येथील अशा तीन गुन्ह्यांची कबुली दिली. दोघांना अटक करून दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक किरण चौगले यांच्या उप निरीक्षक बाळकृष्ण गायकवाड, गौतम सोनकांबळे, मेघराज रुपनर, अक्षय माने, अभिजीत पाटील, बंडू पवार, सचिन कोळी, मनोज निळकंट यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.