Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्यातील 341 उपनिरीक्षकांना सहायक निरीक्षकपदी बढती सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येकी 9 तर साताऱ्यातील तिघांचा समावेश

राज्यातील 341 उपनिरीक्षकांना सहायक निरीक्षकपदी बढती 
सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येकी 9 तर साताऱ्यातील तिघांचा समावेश

मुंबई : खरा पंचनामा 

राज्य पोलीस दलातील तब्बल 341 उपनिरीक्षकांना सहायक निरीक्षकपदी बढती देऊन बदलीने त्यांची पदस्थापना करण्यात आली आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) सुप्रिया पाटील-यादव यांच्या सहीने शुक्रवारी हे आदेश काढण्यात आले आहेत.

पदोन्नतीने बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना महसूल विभाग वाटप करून त्यांची पदस्थापना करण्यात आली आहे.
पदोन्नतीने पदस्थापना करण्यात आलेले अधिकारी जिल्हानिहाय 
सांगली : सुषमा खोत-मोहिते, किरण मगदूम, राजश्री दुधाळे, विकास जाधव, लक्ष्मण खरात (सर्व मुंबई शहर), सचिन शेंडकर (एसीबी), उदयसिंग काळे (एएनटीएफ, पुणे), अफरोज पठाण (पुणे शहर).

कोल्हापूर : सुप्रिया दुरंदे, अमित पाटील, अरुण डोंबे, सागर पवार, महेश कोंडूभैरी, दत्तात्रय भोजणे, सुरेखा सूर्यवंशी (सर्व मुंबई शहर), दाजी देठे (अमरावती परीक्षेत्र), नामदेव दांडगे (पिंपरी चिंचवड).

सातारा : विकास शिंदे (मुंबई शहर), सुधीर मोरे (नागपूर शहर), सुवर्णा काटकर (पुणे शहर).

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.