Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

जे बाळासाहेबांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलंराज ठाकरेंचा जबरदस्त टोला

जे बाळासाहेबांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं
राज ठाकरेंचा जबरदस्त टोला

मुंबई : खरा पंचनामा

महाराष्ट्र सरकारने त्रिभाषा सूत्रातील हिंदी भाषेच्या सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर आज (शुक्रवार, ५ जुलै २०२५) ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एकत्र विजयी मेळावा होत आहे.

आज ५ जुलै २०२५ रोजी मुंबईतील वरळी परिसरातील डोम सभागृहात हा मेळावा पार पडणार आहे. यावेळी राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना जोरदार टोला लगावला.

आजचा मेळावा शिवतिर्थावर मैदानात व्हायला हवा होता. मैदान ओसंडून वाहिलं असतं. पाऊस आहे. त्यामुळे मुंबईत जागा मिळत नाही. बाहेर उभे आहेत. त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आता स्क्रिनवर आटपा. मी माझ्या मुलाखतीत म्हटलं होतं. त्यातून या गोष्टी सुरू झाल्या,. कोणत्याही वादापेक्षा आणि कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, असं मी म्हटलं होतं. २० वर्षानंतर उद्धव आणि मी एका मंचावर येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही आम्हा दोघांना एकत्र आणण्याचं ते देवेंद्र फडणवीस यांना जमलं, असे राज ठाकरे म्हणाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.