ठाकरे बंधुंच्या भाषणाचा पहिलाच दणका!
केडिया गुडघ्यावर, मागितली माफी
मुंबई : खरा पंचनामा
शेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवणूकदार आणि 'केडियोनॉमिक्स' या ट्रेडिंग फर्मचा संस्थापक सुशील केडिया यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मराठीच्या मुद्द्यावरून चॅलेंज केले होते.
त्यानंतर मनसे सैनिकांनी वरळीच्या विजयी मेळाव्याआधीच केडियांचे ऑफिस फाडले. त्यांच्या ऑफिसवर नारळ फेकले. आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर केडिया गुडघ्यावर आले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत राज ठाकरे यांची माफी मागितली आहे.
आज, 5 जुलै रोजी वरळी डोम येथे विजयी मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे जवळपास 18 वर्षांनी एकत्र आले आहेत. अनेकांची कित्येक वर्षांपासून त्यांना एकत्र पाहण्याची इच्छा या विजयी मेळाव्याच्या माध्यमातून पूर्ण झाली आहे. हा मेळावा संपताच सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांची माफी मागितली आहे.
सुशील केडिया यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला ते, 'नमस्कार, माझा ट्वीटचा वेगळा अर्थ काढण्यात आला' असे बोलताना दिसत आहेत. पुढे व्हिडीओमध्ये त्यांनी राज ठाकरेंची माफी मागितली आहे. मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. मी माझे वक्तव्य मागे घेतो असे ते म्हणाले.
'नोंद घ्या राज ठाकरे मी तीस वर्षांपासून मुंबईत राहतो तरी मला मराठी येत नाही. आता तुमचं याबाबत बेफाम गैरवर्तन पाहता मी पण प्रतिज्ञा करतो जोपर्यंत तुमच्यासारखे लोक मराठी भाषेचे कैवारी म्हणून वावरत आहेत. तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही. काय करायचे बोला...', असे सुशील केडियाने म्हटले होते.
सुशील केडिया केडियानॉमिक्स या नावाची रिसर्च फर्म चालवतात. केडियानॉमिक्स या रिसर्च फर्मचे सुशील केडिया संस्थापक आहेत. ही संस्था संपत्ती नियोजन, आर्थिक सल्ले, आर्थिक विश्लेषणाच्या सेवा पुरवते. शेअर बाजारातील गुंतवणूकदार तज्ञ अशी केडिया यांची ओळख आहे. भारतीय शेअर बाजाराचा 20 वर्षांचा अनुभव असल्याचाही त्यांचा दावा आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.