Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

विशेष पोलीस महानिरीक्षक अंकुश शिंदे यांचा स्वेच्छानिवृत्तीसाठी शासनाकडे अर्ज?

विशेष पोलीस महानिरीक्षक अंकुश शिंदे यांचा स्वेच्छानिवृत्तीसाठी शासनाकडे अर्ज?

कलावती गवळी 
छत्रपती संभाजीनगर :  खरा पंचनामा

वरिष्ठ आयपीएस अधिकारी व राज्य गुप्तवार्ता (अतिमहत्त्वांच्या व्यक्तीची सुरक्षा ) विभागात विशेष पोलीस महानिरीक्षक असलेले अंकुश शिंदे यांनी अलीकडेच स्वेच्छानिवृत्तीसाठी शासनाकडे अर्ज दाखल केला आहे. नियमित निवृत्तीला अवघे सहा महिने शिल्लक असताना अंकुश शिंदे यांनी हे पाऊलं का उचलले, या मागचे कारण गुलदस्त्यात आहे. यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. 

बीड जिल्ह्याचे रहिवासी शिंदे 2003 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी 22 एप्रिल 2018 रोजी एकाच दिवशी 39 व आपल्या कार्यकाळात 72 नक्षलवाद्यांना ठार मारण्याची कामगिरी केली आहे. नाशिक, अलिबागचे पोलीस अधीक्षक सोलापूरचे पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी कारकीर्द चांगलीच गाजवली होती. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त असताना 2022 मध्ये 9 महिन्यांतच त्यांना अचानक बदलण्यात आले. पिंपरी चिंचवड येथून बदलण्यासाठी आयुक्तपद उन्नत केल्याची चर्चा त्यावेळी होती. 

नाशिकमध्ये पोलीस आयुक्त असताना एका मोठ्या रकमेच्या अपहारांच्या गुन्ह्यात तक्रारदार व आरोपी यांच्या बाजूने तत्कालीन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी परस्परविरोधी भूमिका घेतली. या प्रकरणात डिसेंबर 2003 मध्ये त्यांची मुदतपूर्व बदली झाली अशी पोलीस दलात त्यावेळी चर्चा होती. दोनवेळा आयुक्त पदावरून अकारण झालेल्या बदल्यांमुळे त्यांनी स्वेच्छेने निवृत्त होण्याचा मार्ग पत्करल्याची चर्चा आहे. शिंदे यांनी या संदर्भात बोलण्यास नकार दिला आहे. मात्र शासनाने त्यांच्या अर्जावर अद्याप निर्णय घेतलेला नाही.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.