Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सातारा जिल्हा हादरला, अनैतिक संबंधातून प्रियकरांने विवाहित महिलेला संपविले शिवथरमध्ये महिलेचा अनैतिक संबंधातून खुन, प्रियकराला पुण्यातून अटक

सातारा जिल्हा हादरला, अनैतिक संबंधातून प्रियकरांने विवाहित महिलेला संपविले 
शिवथरमध्ये महिलेचा अनैतिक संबंधातून खुन, प्रियकराला पुण्यातून अटक 

संभाजी पुरीगोसावी
सातारा : खरा पंचनामा 

सातारा जिल्ह्यातील शिवथर गावात अनैतिक संबंधातून पूजा प्रथमेश जाधव (वय 30) या विवाहित महिलेचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केल्याची घटना सोमवारी दुपारी चारच्या सुमारांस घडली. हा खून कोणी व कोणत्या कारणांतून केला हे प्रथमता स्पष्ट झाले नव्हते मात्र सातारा तालुका पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करीत पूजा प्रथमेश जाधव हिचा खून गावातीलच प्रियकर अक्षय रामचंद्र साबळे (वय 28) यांने केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याला पुण्यातून अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून पूजा जाधव हिचा दहा वर्षांपूर्वी शिवथर गावातील प्रथमेश जाधव यांच्याबरोबर  प्रेमविवाह झाला होता. विवाहित पूजा आणि अक्षय साबळे या दोघांचे अनैतिक संबंध होते. यातूनच अक्षय साबळे याने पूजाकडे लग्नाची मागणी केली होती. मात्र पूजा ही विवाहित व तिला सात वर्षाचा मुलगा असल्यामुळे तिने त्यास नकार दिला होता. याचाच राग मनात धरून सोमवारी दुपारी पूजा ही घरात एकटी असल्याचे पाहून अक्षय रामचंद्र साबळे यांनी धारदार शस्त्रांने तिच्या गळ्यावर सपासप वार करून प्रियकर अक्षय साबळे यांनी पुण्याला धूम ठोकली होती. 

या घटनेची माहिती सातारा तालुका पोलिसांना मिळताच तालुका पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी धाव घेतली. तपासाची चक्रे गतिमान करीत अखेर सातारा तालुका पोलिसांनी प्रियकराला पुण्यातून अवघ्या बारा तासात अटक केली आहे. या विवाहितेचा खून गावातीलच अक्षय रामचंद्र साबळे (वय 28) याने केल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी त्याला रात्री मोबाईलच्या लोकेशन वरून पोलिसांनी पुणे येथील स्वारगेट मध्यवर्ती बस स्थानकांच्या परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीमध्ये त्याने आपण हा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. 

अनैतिंक संबंधातूनच हा प्रकार घडल्याचे समोर आले सातारा तालुका पोलीस स्टेशनला ही बातमी समजल्यानंतर तातडीने अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर उपअधीक्षक राजीव नवले, सातारा तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे, पोलीस उपनिरीक्षक नेवसे यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर खून केलेल्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेवुन अवघ्या बारा तासांच्या आत खुन करणाऱ्या प्रियकर अक्षय रामचंद्र साबळे याला पोलिसांनी अटक केली आहे. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ .वैशाली कडुकर उपविभागीय पोलिस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश तांबे, पोलीस उपनिरीक्षक नेवसे, पोलीस उपनिरीक्षक मोर्डे, पीएसआय गुरव, हवालदार मालोजी चव्हाण, ए. एस. माने, आर. जी. गोरे, कुमठेकर यांनी खूनाचा तपास करून जलद गतीने यंत्रणा राबवून खुनी ताब्यात घेतला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.