Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

औषधी गोळ्यांची नशेसाठी वाहतूक, विक्री करणाऱ्या तिघांना अटक 1.72 लाखांचा मुद्देमाल जप्त : मिरजेच्या महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई पहा व्हिडीओ

औषधी गोळ्यांची नशेसाठी वाहतूक, विक्री करणाऱ्या तिघांना अटक 
1.72 लाखांचा मुद्देमाल जप्त : मिरजेच्या महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई 
पहा व्हिडीओ

मिरज : खरा पंचनामा 

मिरज-कुपवाड रस्त्यावर औषधी गोळ्यांची नशेसाठी वाहतूक आणि विक्री करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून 1.72 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी दिली.


आरबाज ऊर्फ इब्राहीम रेठरेकर (वय २१, रा. अमननगर, सुभाषनगर रोड, मिरज), अब्दुलरझाक अब्दुलरहीमान शेख (वय २०, रा. मालगाव रोड, आलीशान कॉलनी, मिरज), उमरफराज राजु शेख (वय ३२, रा. शनिवार पेठ, बागवान गल्ली, मिरज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत अंमली पदार्थ विक्री, तस्करी, वाहतूक, साठा करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना सहायक निरीक्षक शिंदे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या. श्री. शिंदे यांना मिरज ते कुपवाड एमआयडीसी रोडवर चौघेजण औषधी गोळ्यांची नशेसाठी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पथकाने सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले. Nitrosun 10 नावाच्या ९२८ नशेच्या गोळ्यांसह गांजा या अंमली पदार्थाने भरलेल्या ३ चिलीम व गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोपेड मोटारसायकल जप्त करण्यात आली. यातील तिघांना अटक करून अल्पवयीन मुलाला निरीक्षण गृहात पाठवण्यात आले.

महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीमती पूनम पाटील, श्रीमती रुपाली गायकवाड, विनोद शिंदे, सचिन कुंभार, अभिजीत घनगर, अभिजीत पाटील, सर्जेराव पवार, नानासाहेब चंदनशिवे, राजेंद्र हारगे, विनोद चव्हाण, अमोल तोडकर, चसयराज कुंदगोळ यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.