Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

संशयिताची माहिती देणाऱ्यास योग्य बक्षीस देणार : महानिरीक्षक फुलारीपुणे, सोलापूर ग्रामीणच्या पथकाकडून शोध सुरुप्रवासी तरुणीवरील अत्याचार प्रकरण

संशयिताची माहिती देणाऱ्यास योग्य बक्षीस देणार : महानिरीक्षक फुलारी
पुणे, सोलापूर ग्रामीणच्या पथकाकडून शोध सुरु
प्रवासी तरुणीवरील अत्याचार प्रकरण

पुणे : खरा पंचनामा

दर्शनासाठी निघालेल्या कुटुंबातील महिलांना कोयत्याचा धाक दाखवून लूटमार करून तरुणीवर अत्याचार करणाऱ्या एका संशयित आरोपीचे रेखाचित्र तयार केले आहे. त्यासंदर्भाने माहिती देणाऱ्यास योग्य बक्षीस देण्यात येईल. संशयिताला पकडण्यासाठी पुणे आणि सोलापूर ग्रामीण पोलिसांची संयुक्त पथके तयार करण्यात आल्याची माहिती कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी 'खरा पंचनामा'शी बोलताना दिली.
पुणे-सोलापूर महामार्गावरील दौंड भागात सोमवारी पहाटे ही घटना घडली होती. याप्रकरणी दौंड पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गेल्या आठवड्यात (दि. ३० जून) पुण्याहून देवदर्शनास कारने निघालेले कुटुंब पहाटे दौंड परिसरातील स्वामी चिंचोली येथे एका हॉटेलजवळ थांबले होते. कुटुंब चहा पिण्यासाठी थांबले असता दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी महिलेला कोयत्याचा धाक दाखविला. डोळ्यात मिरची पूड टाकून महिलेच्या गळ्यातील दीड लाखांचे सोन्याचे दागिने काढून घेतले. त्यानंतर महिलेबरोबर असलेल्या तरुणीला कोयत्याचा धाक दाखवून हॉटेलच्या मागील झाडीत नेले. तेथे तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला. तिने आरडाओरडा केल्यानंतर चोरटे पसार झाले. या घटनेनंतर घाबरलेल्या कुटुंबांनी दौंड पोलिसांकडे धाव घेतली होती.

या घटनेनंतर जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली होती. पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींचा माग काढण्यासाठी पथके तयार केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, दौंड, तसेच भिगवण पोलीस ठाण्यातील दहा पथके चोरट्यांचा मागावर आहेत. तरुणी व इतरांनी पाहिल्यावरून पोलिसांनी रेखाचित्र तयार केले आहे.

दरम्यान महानिरीक्षक फुलारी यांनीही घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. त्यानंतर पुणे ग्रामीण आणि सोलापूर ग्रामीण पोलिसांना तपासबाबत सूचनाही दिल्या. संशयिताला पकडण्यासाठी पुणे आणि सोलापूर ग्रामीण पोलिसांची संयुक्त पथके तयार केली असून संशयिताची माहिती देणाऱ्यास योग्य बक्षीस देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.