राज्यात वाईन शॉप परवान्याची स्थगिती उठणार?
मुंबई : खरा पंचनामा
राज्य सरकारने गेल्या ५० वर्षांपासून वाईन शॉप परवान्यांवर असलेली स्थगिती उठवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचा महसूल वाढवण्यासाठी नवीन मद्यविक्री परवाने देण्याची योजना असल्याची माहिती समोर येत आहे. विदेशी मद्यनिर्मिती परवाने देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात येणार आहे.
राज्यात ३२८ नवे मद्यविक्री परवाने दिले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. हे नवे परवाने दुकानांना नाही तर कंपन्यांना दिले जाणार आहेत. प्रत्येक कंपनीला ८ परवाने मिळणार असून, हे परवाने भाड्याने देण्याची परवानगी देखील असेल. या परवाना वितरणासाठी स्थापन होणाऱ्या समितीत अजित पवार यांचा समावेश आहे. मात्र, कॅपोव्हिटेज या मद्य निर्मिती कंपनीच्या संचालकपदी जय पवार असल्याने हितसंबंधाचा मुद्दा उपस्थित होऊ शकतो, असा आरोप विरोधकांनी केला आहे.
वेगवेगळ्या योजनांचा सरकारच्या तिजोरीवर भार पडतोय. याची कबुली खुद्द सत्तेमधील नेत्यांनीच वेळोवेळी दिली आहे.. त्यामुळे राज्याचं उत्पन्न कसं वाढणार? यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. अशी प्रतिक्रिया मद्य परवान्यांवर बोलतांना छगन भुजबळ यांनी दिली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.