Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

भारतीय सैन्याची बदनामी भोवली, बडतर्फ जवान चंदू चव्हाणला अखेर अटक

भारतीय सैन्याची बदनामी भोवली, बडतर्फ जवान चंदू चव्हाणला अखेर अटक

धुळे : खरा पंचनामा

नियंत्रण रेषा ओलांडून चंदू चव्हाण पाकिस्तानात गेला होता. तब्बल चार महिने तो पाकिस्तानच्या ताब्यात होता. त्यानंतर भारतीय सरकारने प्रयत्न करुन त्याची पाकिस्तानच्या तावडीतून सुटका केली होती.

या प्रकरणात निष्काळजीपणा दाखविल्याचा ठपका ठेवत लष्करी न्यायालयाने त्याला ८९ दिवसांची शिक्षा सुनावली होती. त्याला सैन्यातून बडतर्फ करण्यात आलं होतं.

सप्टेंबर २०१६ उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर लक्ष्य साधून सर्जिकल स्ट्राईक केला होता. त्याचवेळी भारतीय सैन्य दलातील जवान चंदू बाबूलाल चव्हाण हा सीमा ओलांडून पाकिस्तानमध्ये गेला होता.

भारतीय सैन्य दलातून बडतर्फ करण्यात आल्याच्या रागातून चंदू चव्हाण याने युट्यूब चॅनल सुरु करुन भारतीय सैन्यदलाचीच बदनामी करण्यास सुरुवात केली. सैन्य दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदनामी करणं, भारतीय सैन्य दलातील जवानांमध्ये बंड घडवून आणण्याचा प्रयत्न करणे याप्रकरणी त्याच्याविरोधात नाशिक जिल्ह्यातील देवळाली कॅम्प पोलिसांत ठाण्यात मे महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यात अखेर चंदू चव्हाणला पोलिसांनी अटक केली आहे. देवळाली कॅम्प पोलिसांच्या शोध पथकाने गुरुवारी (ता. १०) धुळे येथील मोहाडी पोलिस ठाण्यातून अटक केली. रात्री दहा वाजता त्याला देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात आणण्यात आलं.

आपल्याला मारहाण झाल्या प्रकरणी तक्रार देण्यासाठी चंदू चव्हाण मोहाडी पोलिस ठाण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी त्यास बसवून ठेवलं. तोपर्यंत इकडे देवळाली कॅम्प पोलिस ठाण्याचे पथक त्याला अटक करण्यासाठी रवाना झाले व त्याला ताब्यात घेतलं.

चंदू चव्हाण हा मुळचा धुळे जिल्ह्यातील मोहाडी येथील रहिवासी आहे. आर्टिलरी वर्कशॉपचे नायब सुभेदार सचिन गंगाधर गुंजाळ यांनी चंदू चव्हाण याच्या विरोधात फिर्यादी दिली होती. या तक्रारीनुसार चंदू चव्हाण यास सैन्य दलातून बडतर्फ करण्यात आलेलं आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.