Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पैशाने भरलेली बॅग अन् हातात ग्लास घेऊन बेडवर बसलेशिरसाटांचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

पैशाने भरलेली बॅग अन् हातात ग्लास घेऊन बेडवर बसले
शिरसाटांचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

मुंबई : खरा पंचनामा

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये ते बेडवर बसलेले असून हातामध्ये ग्लास दिसतोय तर बेडच्या खाली पैशांनी भरलेली एक सुटकेस दिसत आहे.
या व्हिडीओमध्ये संजय राऊतांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. 'खरा पंचनामा' या व्हिडीओची पुष्टी करीत नाही.

संजय राऊत यांनी या व्हिडीओशी संबंधित दावा केला होता. त्यानंतर हा व्हिडीओ समोर आलेला आहे. पैशांच्या बॅगेसह संजय शिरसाट असल्याचा दावा होता. प्रसारमाध्यांच्या हाती व्हिडीओ लागलेला असून व्हिडीओने खळबळ उडाली आहे.

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर संजय शिरसाट यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले की, संजय राऊतांनी ठरल्याप्रमाणे भुंकण्याचं काम केलेलं आहे. एकनाथ शिंदे साहेब हे दिल्लीला गेले होते आणि मुख्यमंत्री करा, असं ते म्हणाले. हे मुर्खासारखं स्टेटमेंट करणं त्यांनाच जमू शकतं. सकाळी उठलं की एकनाथ शिंदे, दुपारी उठलं की एकनाथ शिंदे, संध्याकाळी एकनाथ शिंदे.. त्यांची दाढी, त्यांचा करिष्मा.. याला ते टार्गेट करतात.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.