राज्य उत्पादन शुल्कच्या दोन अधीक्षकांना पदोन्नती
साताऱ्याचे अधीक्षक रवींद्र आवळे उप आयुक्त (निरीक्षण)
मुंबई : खरा पंचनामा
राज्य उत्पादन शुल्क विभागातील दोन अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने बदल्या करण्यात आल्या आहेत. शासनाचे सह सचिव रवींद्र औटे यांच्या सहीने बुधवारी हे आदेश काढण्यात आले आहेत.
साताऱ्याचे सध्याचे अधीक्षक रवींद्र आवळे यांची मुंबई येथील आयुक्त कार्यालयात उप आयुक्त (निरीक्षण) या पदावर पदोन्नतीने पदस्थापना करण्यात आली आहे. गणेश पाटील यांची पदोन्नतीने विभागीय उप आयुक्त, नागपूर विभाग, नागपूर येथे पदस्थापना करण्यात आली आहे.
श्री. आवळे यांनी यापूर्वी कोल्हापूरचे अधीक्षक म्हणूनही काम केले आहे. त्यावेळी त्यांनी गोवा बनावटीच्या दारू तस्करांवर मोठया प्रमाणात कारवाई केली होती. त्यांच्याकडे काही काळ सांगलीचाही पदभार होता. त्यावेळी त्यांनी रात्री उशिरापर्यंत सुरु राहणारे बार, गोवा तसेच अन्य बनावटीची दारू विकणाऱ्यांवर कारवाईचा धडाका लावला होता. त्यांना आता उप आयुक्त पदी बढती मिळाली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.